
विहीरीत सापडला मृत बिबट्या, शिकार करताना विहिरीत पडल्याचा संशय.. मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथील घटना!
मुक्ताईनगर:- तालुक्यातील भोटा शिवारात एका विहिरीत बिबट्याचा मृतदेह सापडला आहे. शिकारीचा पाठलाग करत असताना तो विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भोटा येथील गट क्रमांक ८१ मधील शेतकरी रायबा तुळसीराम मोरे बुधवारी सकाळी शेतात गेले असता त्यांना दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली. त्यांनी दुर्गंधीचा उगम शोधण्यासाठी विहिरीकडे पाहिले असता पाण्यात बिबट्याचा मृतदेह तरंगताना…