
कर्जमाफीचं आश्वासन हवेत विरलं – शेतकरी संघटना संतप्त; सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात; आंदोलनाची दिशा लवकरच ठरणार – दामोदर शर्मा
मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा न झाल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. भाजप-महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन विसरल्याची टीका जिल्हाध्यक्ष दामोदर शर्मा यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. *कर्जमुक्तीचं आश्वासन फसवं* विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने जाहीरनाम्यात कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार…