Headlines

तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल!

धाड : येथील मुख्य चौकात अतिउत्साही तरुणांनी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याची घटना दि. ७ सप्टेंबर रोजी घडली होती याप्रकरणी पोलिसांनी त्वरित हालचाल करीत तलवार जप्त केली; परंतु दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. धाड येथे ७ सप्टेंबर रोजी धाड पोलिस ठाण्यानजीकच्या चौकात एका तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यात अक्षय नामक तरुणाने हातात तलवार घेऊन केक कापल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तलवार जप्त करत त्याची डायरीमध्ये नोंद केली होती; परंतु याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, घटनेच्या सहाव्या दिवशी धाड पोलिसांनी या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक मंगल मिसाळ यांच्या जय पांडे, सूरज लोखंडे, गोलू गुजर, दीपक गुजर, राहुल दळवी, सूरज वाघ आणि रोशन गणेश शिंदे (सर्व रा. धाड) यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *