नांदुरा : नांदुरा हद्दीतून दुचाकीची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी बोराखेडी, मुक्ताईनगर, नांदुरा याठिकाणच्या तीन गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. जिल्ह्यातील दुचाकी चोरींच्या घटनांमुळे पोलिस अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करून गुन्ह्याची उकल, आरोपींचा शोध आणि मुद्देमाल हस्तगत करण्याचा आदेश देण्यात आला. नांदुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोकलवाडी येथील जयप्रभू शंकर भगत यांची दुचाकी चोरी झाल्याची तक्रार ६ जुलै २०२४ रोजी नांदुरा पोलिसात दाखल होती. त्यामध्ये त्यांची दुचाकी क्रमांक एमएच-२८, बीपी-६४४८ शेतातून चोरून नेली होती. या गुन्ह्यात २ आरोपींना मलकापूर आणि मुक्ताईनगर परिसरातून अटक करण्यात आली. राजू मंगल जगताप (२८), रा. बेलाड ता. मलकापूर, श्रावण देवसिंग भोसले रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर यांचा समावेश आहे.
नांदुऱ्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक, दोन्ही आरोपी मलकापूर मुक्ताईनगर तालुक्यातील
