Headlines

नाली साठी खोदलेला सिमेंट काॅक्रिटचा रस्ता पोलीसांच्या मध्यस्थीने वाकोडी ग्रा.प.ने केला सपाटीकरण,शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी केली होती मागणी

मलकापुर:- शहरालगत असलेल्या वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर मधील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरासमोरील नाली करण्यासाठी एक वर्षापूर्वी उपसरपंच शैलेंद्रसिंह राजपूत यांनी सिमेंट काॅक्रिटचा रस्ता खोदला, रस्ता खोदकाम करतांना खोदकामाच्या ठिकाणी सिमेंट काॅक्रिटचा माल टाकून रस्ता सपाटीकरण करून देण्याचे राजपूत यांनी स्थानिक रहिवाश्यांना सांगितले होते मात्र एक वर्ष उलटून सुद्धा रस्ता सपाटीकरण केला नसल्याने या रस्त्यावरुन ये-जा करतांना लहान मुले पडून अनेक अपघात झाले आहे गत सप्ताहात दोन वर्षीय नकुल ठोसर हा याच रस्त्यावर डोक्यावर पडला जख्मी झाला,त्याच्या डोक्याला मार लागल्याने डॉ.नी त्याचे डोक्याला सहा टाचे दिले.याबाबतची माहिती त्यावेळी हि राजपूत यांना दिली मात्र त्यांनी या कडे दुर्लक्ष केले बुधवार रोजी सायंकाळी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी भ्रमणध्वनीवरुन या खोदलेल्या रस्त्याचे सपाटीकरण न केल्यास “भिक मांगो आंदोलन करुन खोदलेला सिमेंट रस्त्याचे सपाटीकरण करु असा इशारा दिल्याने उपसरपंच राजपूत यांनी भ्रमणध्वनीवरच ठोसर यांना अश्लील भाषेत शिविगाळ सुरू केली.व आपल्या दोन -तिन समर्थकांसह हातात तलवार, लाठ्याकाठ्या,पाईप,दगडं घेऊन ठोसर यांच्या घरावर चाल केली महिलांना अश्लील शिविगाळ करुन गदारोळ माजविल्याने गजानन ठोसर यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली, ठोसर यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी उपसरपंच शैलेंद्रसिंह राजपूत सह तिघांविरुद्ध अप.न.0384/24कलम 296,351(2),3(5) नुसार गुन्हा दाखल केला होता.

पाच दिवसांत खोदलेला सिमेंट रस्त्याचे सपाटीकरण न केल्यास रहिवासी ग्रामस्थ व महिला त्याच खोदलेल्या रस्त्यावरच स्वातंत्र्य दिनी 15 ऑगष्ट 24 गुरूवार रोजी आमरण उपोषणाचा इशारा शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला होता या मध्ये पोलीसांच्या मध्यस्थीने वाकोडी ग्रामपंचायत प्रशासनाने खोदलेल्या रस्त्याचे स्वातंत्र्य दिनी सिमेंट काॅक्रिटने सपाटीकरण करून दिल्याने आमरण उपोषण स्थगित करण्यात आले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *