भालेगाव बाजार: भालेगाव बाजार येथील ४० वर्षीय विवाहिता सुनीता राजेश हुरसाड ही ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी घरातून निघून गेली होती, त्यानंतर गुरुवारी सकाळी ९ वाजता त्या महिलेचा मृतदेह गावशिवारातील विहिरीत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राप्त माहितीनुसार, बुधवारी गावात बऱ्याच ठिकाणी महालक्ष्मीचा महाप्रसाद व इतर धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे विवाहिता एखाद्या धार्मिक कार्यक्रमात असेल, असे कुटुंबीयांना वाटले. रात्री, बराच वेळ झाल्यानंतरही विवाहिता घरी परतली नाही. नातेवाइकांकडे रात्रभर शोधाशोध केली. परंतु, विवाहिता दिसली नाही. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता दरम्यान शिवारातील सुरेश तिजारे यांच्या शेतातील विहिरीत विवाहितेचे प्रेत तरंगताना आढळले. याप्रकरणी राजेश लक्ष्मण हुरसाड यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.