खामगाव : जालना नजीक उभ्या ट्रकवर कार धडकून झालेल्या अपघातात खामगावातील सानंदा कुटुंबातील तिघे जखमी झाल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, सानंदा कुटुंबातील काहीजण पूणे येथून कार क्र. एमएच २८-एएन २१९१ ने खामगावकडे निघाले होते. दरम्यान पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास जालना नजीक त्यांची कार रोडवर उभ्या असलेल्या ट्रकवर जोरात धडकली. या अपघातात कारमधील प्रशांत सानंदा, सौ. जयश्री सानंदा, रविंद्र सानंदा हे तिघे जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातात कारचालक बजरंग सपकाळ याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
उभ्या ट्रकला कारची धडक, अपघातात सानंदा परिवारातील तिघे जखमी!
