मलकापूर , १५ ऑगस्ट: पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या उन्मेषात साजरा करण्यात आला. एनसीसी शाखेने राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी परेडचे नेतृत्व केले. या सोहळ्याला उपस्थित प्रमुख पाहुणे गुजराती समाज अध्यक्ष तथा संत जलाराम सेवा समिती सचिव श्री चंद्रकांत हरजीवनदास पोपट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण व राष्ट्रगीता नंतर प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएस विभागाने या आठवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दिनांक १२ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पोस्टर प्रेसेंटेशन आणि पथनाट्य सादर केले. दिनांक १३ ऑगस्टला ‘एक पेड माँ के नाम’ हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्याने मातृभक्तीचे महत्व अधोरेखित केले. यानंतर, दिनांक१४ ऑगस्ट रोजी महाविद्यालय परिसरात उत्साही वातावरणात रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कॉम्पुटर विभागानेही सहभाग घेत, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. महाविद्यालयाचे एनसीसी प्राध्यापक लेफ्टनंट मो. जावेद, एनएसएस अधिकारी प्रा. सचिन बोरले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. एनसीसी चे कमाडिंग ऑफिसर उमेश शुक्ला, रसलदार मेजर कमल किशोर यांनीही विशेष मार्गदर्शन केले. महाविद्यालयाने आयोजित केलेले हे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रेरणादायी ठरले. स्वातंत्र्य दिनानिमित्त साजरा केलेल्या या आठवडी कार्यक्रमात महाविद्यालयाचे चेअरमन श्री. डी. एन. पाटील उपाख्य नानासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल व उद्योजकता विकास सेलच्या वतीने दरवर्षी आपल्या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या व आपापल्या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपले करिअर बनविणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना नेहमीच उत्स्फूर्त पणे साथ देत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्नशील राहत आहे.त्याचाच एक भाग म्हणून माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक म्हणून वावरणाऱ्याचा ह्या वर्षीपासून “सर्वोत्तम उद्योजक पुरस्कार 2024 ” देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये उद्योजक आनंद जैन, कार्तिक खाचणे, प्रसिस हिवाळे, दीपक पाटील यांचा समावेश होता. याप्रसंगी त्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे संचलन सेलचे को –ओर्डीनेटर प्रा.अमोघ मालोकार यांनी यशस्वीरित्या केले.
स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. अमोल तांबे यांनी केले. या सोहळ्याला महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. संदीप खाचणे, प्रा. नितीन खर्चे, प्रा. योगेश सुशीर, प्रा. सुदेश फरपट, प्रा. सदाशिव लवंगे,प्रा. राजेश सरोदे, प्रा. जयप्रकाश सोनोने, प्रा. साकेत पाटील, प्रा. महेश शास्त्री, स्पोर्ट्स अधिकारी कैलास कोळी, तसेच प्राध्यापिका तेजल खर्चे, प्रा. संगीता खर्चे, प्रा.मंजिरी करांडे, मयुरी पाटील, माधुरी राजपूत, साक्षी जुनारे सोबतच नॉन टीचिंग कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.