मलकापुर (दाताळा) :- ग्रामीण भागातील घवघवीत यश प्राप्त करणारी आणि विद्यार्थ्यांना शिस्तप्रिय कौशल्यवान बनवणारे शाळा म्हणजे डी.ई.एस. हायस्कूल नेहमीच चर्चेत असते आणि शाळेमधील विद्यार्थी नवनवीन उपक्रम करत असतात त्यामुळे देश पातळीवर तालुक्याचे तसेच जिल्ह्याचे नाव रोशन करतात. यातच आणखी भर पडली ती अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत अटल इनोवेशन मिशन व नीती आयोग द्वारा आयोजित अटल मॅरेथॉन 2022 – 2023 मध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान उपकारांचे राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. त्याबद्दल विद्यार्थी तसेच शिक्षकांचे तालुक्यांमध्ये मोठं कौतुक होत आहे. यामध्ये पुष्कर अनंत पाटील व श्लोक विजय चौधरी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व श्री व्ही. पी. नारखेडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते यांच्या नावीन्यपूर्ण उपकरणांचे राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल यांना स्वतंत्र दिनानिमित्त नवी दिल्ली येथे सहभागी होण्याचा मान मिळवलेला आहे विशेष म्हणजे 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट रोजी सहभागी होण्यासाठी विशेष आमंत्रन सुद्धा आलेज्ञ आहे.ग्रामीण भागामधून स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीला जात असलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व शाळेमधील इतर विद्यार्थी पण त्यांची प्रेरणा घेऊन नवनवीन उपक्रम निर्माण करतील हीच सगळ्यांची अपेक्षा आहे.
डी. ई. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज दाताळा येथील नाविन्यपूर्ण विज्ञान उपकरणांची राष्ट्रीय स्तरावर
