मलकापुरात चोरींचे सत्र सुरूच, बसस्थानकातून महिलेच्या गळ्यातील 4 ग्रामचे मंगळसूत्र लांबविले ! चोरांना पकडण्यासाठी नवीन ठाणेदारांसमोर मोठे आवाहन..

मलकापूर( उमेश इटणारे ) :- बस स्थानकातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास झाल्याची घटना दि.10 रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे. दरम्यान वेळेअभावी महिलेने पोस्टेत तक्रार देण्याचे टाळले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की एक महिला शेंदुर्णी येथे जाण्यासाठी मलकापूर बस स्थानकात साडेतीन वाजेच्या सुमारास आल्या होत्या, दरम्यान बसला वेळ असल्याने त्या बसची वाट पाहत त्या उभ्या होत्या, बस आल्यानंतर बसमध्ये चढत असताना कोणीतरी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले ही घटना बस मध्ये बसल्यानंतर महिलेच्या लक्षात आल्याने सदर महिलेने आरडाओरड केली. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी बस मधील प्रवाशांची तपासणी केली मात्र काहीही हाती आले नाही. ह्या प्रकरणी महिलेने वेळेअभावी तक्रार देण्याचे टाळले आहे. दरम्यान मलकापूर शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर चिंता व्यक्त केली जात असून नवीन ठाणेदारांसमोर चोरांना पकडण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!