मलकापूर: दिनांक ०७ ऑगस्ट रोजी पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत तहसील कार्यालय मलकापूर व कोलते महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महसूल पंधरवडा’ अंतर्गत ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते फडके अकॅडमी फॉर करियर अकोला चे संचालक प्रा. सतीश फडके होते. प्रमुख उपस्थितीत मलकापूर शहराचे तहसीलदार राहुल तायडे, बेंजो केमिकलचे डायरेक्टर प्रल्हाद झोपे, चैतन्य केमिकलचे एमडी प्रसन्न देशपांडे, धनंजय देशपांडे, राजेश गावंडे, श्रीकृष्ण उगले, कुलकर्णी, पारवे आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कोलते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी उपस्थित मान्यवरांचे शौल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विविध शासकीय योजनांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन, डॉ. युगेश खर्चे, प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. सचिन बोरले, प्रा. पराग चोपडे, प्रा. सुदेश फरपट, प्रा. राजेश सरोदे, प्रा. तेजल खर्चे, प्रा. ऋतुजा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल तांबे यांनी केले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शासकीय योजनांबद्दल अधिकाधिक माहिती मिळाल्याने त्यांना भविष्यातील संधींचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.