Headlines

पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी पाच दिवसीय विकास कार्यक्रमाचे आयोजन

 

 

मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे दिनांक 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत ‘इनोव्हेशन स्ट्रॅटेजी इन इंग्लिश लँग्वेज’ या विषयावर महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी इंग्लिश कम्युनिकेशन कोच आणि मोटिवेशन ट्रेनर भरत आर. साळवे सर यांचे मार्गदर्शन महाविद्यालयातील प्राध्यापकांना या पाच दिवसीय कार्यक्रमांमध्ये लाभणार आहे.

दिनांक 3 ऑगस्ट रोजी प्राध्यापकांच्या विकास कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे आणि प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी कार्यक्रमासाठी लाभलेले मुख्य वक्ते भरत आर. साळवे सर यांचे शॉल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल तांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रमाकांत चौधरी यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक संदीप खाचणे, नितीन खर्चे, योगेश सुशीर, सुदेश फरपट, मो. जावेद, संतोष शेकोकार, सदाशिव लवंगे, साकेत पाटील, महेश शास्त्री, मनोज वानखडे, नितीन भारंबे, सचिन बोरले, रामेश्वर मोळे तसेच प्राध्यापिका तेजल खर्चे, मंजिरी करांडे, रूपाली पाटील, माधुरी तोष्णीवाल, शिवानी राजपूत, साक्षी जुनारे आदीसह महाविद्यालयातील पूर्ण प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी साळवे सर यांनी इंग्लिश कम्युनिकेशनमधील नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. प्राध्यापकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आणि कार्यक्रमाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला.

या पाच दिवसीय कार्यक्रमादरम्यान प्राध्यापकांना विविध सत्रांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांची इंग्लिश कम्युनिकेशन कौशल्ये अधिकाधिक विकसित होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *