मलकापुर :- सोनार समाज चॅरिटेबल ट्रस्ट या समाजसेवी संघाच्या वतीने दि.20 जुलै रोजी नांदुरा येथे भंव्य स्वरुपात सोनार समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी नांदुरा येथील सामाजिक एवंम उद्योजक अनंतराव उंबरकर यांनी भुषविले, अनंतराव यांचे अध्यक्षतेखाली मेळाव्याला सुरवात झाली,सर्व प्रथम मेळाव्याचे उद्घाटन ऑल ईंडीया सोनार फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष मोहनराव हिवरकर भोकरदन व मांन्यवरांच्या हस्ते रितसर पार पडले,व सोबतचं श्री संत नरहरी महाराज यांचे यथोचित पुजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन अखिल माळवी सोनार महासंघाचे अध्यक्ष विलासराव अनासाने अकोला हे लाभले तर प्रमुख वक्ते सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी सुनिल विंचनकर मलकापुर,प्रशासकीय अधीकारीअरुणराव सागळे यवतमाळ हे लाभले तसेचं प्रमुख उपस्थिती म्हणुन अमरावती संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुंबळे युवा उद्योजक ,शैलैश खरोटे,डॉ. गजानन कर्हे,अशोकराव हिरुळकर,सुभाष ठोसर,राजेश फुलोरकर, गजानन ठोसर,सुभाष ईटनारे,विवेक उज्जैनकर,श्रीराम ठोसर,मनिष उज्जैनकर, रविंन्द्र ईटनारे,रविद्र घुसळकर ,विवेक अंगाईतकर यवतमाल,ईत्यादी मांन्यवर उपस्थीत होते.पाहुणे येताक्षणी स्वागत गेटवर फटाक्याच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले .यावेळी परिसर दुमदुमला होता,यानंतर पाहुण्यांना व्यासपिठावर पाचारण करण्यात आले,पाहुणे येताक्षणी,आपल्या समाजातील स्वर्गीय त्रंबकराव उंबरकर,वामनराव ईटनारे,सुरेशराव टकोरे,गजाननराव लोणकर व ज्ञात अज्ञात देवंगतांना एक मीनिट मौन पाळुन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.यानंतर पाहुण्यांची यथोचित सत्कार समारंभ पार पडला , तसेचं विषेश सत्कार म्हणुन भास्कर ठोसर वडनेर भोलजी,मुरलीधर अनासाने अकोट,मनिष उज्जैनकर, रविन्द्र ईटनारे,सौ मिराताई उंबरकर,सौ विंचनकर, ईत्यादी महीला पुरुष वर्गाचा सत्कार करण्यात आला,यावेळी महीलांची उपस्थीती लाक्षणिय होती,युवकांचा उत्साह ओसंबळुन वाहत होता.यावेळी श्री शिरोमणी नरहरी महाराज व कुलस्वामीनी श्री आशापुरीदेवी यांच्या जयघोशात संपुर्ण सभामंडप दुमदुमुन गेला होता.मेळाव्याचे उदघाटक मोहनराव हिवरकर यांनी आपल्या उदघाटनिय भाषणात संबोधीत करतांना. आपल्या समाजाच्या कित्येक प्रमुख मागण्या अनेक वर्षापासुन सरकार दरबारी धुळखात पडल्या आहेत,याला एकचं कारण आपण एकसंघ नाही,आपण,आपले कुटुंब,हिचं आपली चौकट बनली आहे,या चौकटीमधुन बाहेर येवुन सामाजिक उत्तरदायित्व समजुन एकसंघ होणे ,हि काळाची गरज आहे.असे प्रतिपादन केले, तसेचं सोनार महासंघाचे अध्यक्ष व मेळाव्याचे प्रमुख पाहुणे विलास अनासाने यांनी युवकांना संबोदीत करतांना म्हटले की आपल्या समाजातील युवकांनी नुसते ज्वेलरी कामाच्या चौकटीत न राहता,काळानुरुप बदल घडवत ईतर क्षेत्र सुध्दा पादाक्रांत करायला हवे ,तसेचं मेळाव्याचे प्रमुख वक्ते अभ्यासु व्यक्तीमत्व अरुण सागळे यांनी आपल्या ओजस्वी भाषणात पुष्प गुफतांना म्हटले,जोपर्यंत आपला राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण होत नाही,व आपला वेगळा दबावगट निर्माण होत नाही,तोपर्यंत आपण असेचं दुर्लक्षीत राहणार आहोत,करीता आपला राजकारणात वावर महत्वाचा आहे,तसेच येत्या निवडणुकीत आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहतील व आपण त्यांना प्रेरीत करणार असल्याचे सांगीतले,तसेचं अप्पर जिल्हाअधीकारी सुनिल विंचनकर यांनी आपल्या प्रसासकीय सेवेत असतांनाचे आपले अनुभव विषद केले व त्याचं अभ्यासाची चुनक दाखवित,येत्या विधानसभा निवडणुकीत आपले जास्तीत सोनार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करुन,त्यां उमेदवाराला कुठलाही पक्षाचे तिकीट मिळो अथवा नां मिळो, त्यांना आपण निवडुन आणायचे,आणी कसे निवडुन आणायचे याचे सुत्रसुध्दा त्यांनी सांगीतले,तसेचं मी स्वतः येत्या विधानसभेला मलकापुर मतदार संघात निवडनुकीत उभे राहणार असल्याचे सांगीतले,व याकरीता मी ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाची मते हवी आहेत,त्यावर उपस्थीतांनी भरभरुन प्रतिसाद देत एका सुरात समर्थन व्यक्त केले.यानंतर काही निवडक उपस्थीत वक्तांचे भाषणे झाली.शेवटी मेळाव्याचे अध्यक्ष अनंतराव उंबरकर यांनी अध्यक्षीय भाषणात,संबोदन करतांना उपस्थीताच्या मनाचा वेध घेत,आपला समाज आपणास जरी आर्थीक दृष्ट्या संपन्न वाटला तरी हे वरवरचे चित्र आहे,आपण जर कां?समाजाच्या मुळाशी खोलवर शिरलो असता काही बाबी प्रकर्षाने लक्षात येतील,आपला सोनार समाज ग्रामीन विभागात अतिशय दयनिय व बिकट परीस्थीतीत आपले दैनंदीन जिवन जगत आहे, त्यांच्या पोटापाण्या व्यतिरिक्त त्यांच्या मुला मुलींच्या शैक्षनिक समस्या वैवाहीक समस्या वैध्यकीय समस्या अशा कीतीतरी समस्या त्यांच्यासमोर आहेत,त्यांना या खाईतुन बाहेर काढणे हि काळाची गरज आहे,त्याकरीता आपणासारख्या ज्ञाती समाज घटकांनी समोर येवुन या गरीब कुटुबांना हातभार लावायला हवा,त्याकरीता सरकारी दरबारी पडुन असलेल्या संत नरहरी आर्थीक विकास महामंडल सारख्या योजना आपणास दबातंत्र वापरुण पारीत करुन घेणे गरजेचे आहे,यानंतर मोहनराव हिवरकर यांचे अध्यक्षते खाली आल ईंडीया सराफ फेडरेशनच्या वतीने २०१५ला राज्य व केन्द्र शासनाकडे असलेल्या मागण्या,त्याचं प्रमुख मागण्यांचा पुन्हा ठराव घेण्यात आला,
मागण्या पुढीलप्रमाने
श्री संत नरहरी महाराजांचे नावे डाकतिकीट,चरणी नाणे काढणे,संत नरहरी आर्थीक विकास महामंडळ, नाना शंकरशेठ यांचे नाव सेन्ट्रल रेल्वे मुंबई ला देणे,
ईत्यादी मागण्यांचा ठराव मंजुर करण्यात आला.
ठरावाचे वाचन प्रभाकर कर्हे यांनी वाचुन दाखविला,
सभा समाप्ती शेवटी राष्ट्रगित करुण करण्यात आली. सुत्रसंचालन अनिल उंबरकर यांनी उत्कृष्ट रित्या केले,व आभार प्रदर्शन अमोल बुडुकले यांनी मानले,यांनतर स्वरुची भोजनाचा कार्यक्रम पार पडला,दुपारचे संत्रात निवडक मान्यवरांचे चर्चा,,चिंतन मंथन घेण्यात आले,,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक युवक सहभाग घेतला,यामध्ये संतोष विंचनकर,भुषण विंचनकर,प्रशांत उंबरकर,हर्शल बुडुकले,प्रकाश बडोकार,अनंता सुरपाटणे,प्रसाद दैवज्ञ,संतोष दैवज्ञ,,शिध्देश्वर बुडुकले,योगेश बुडुकले,सागर राउतराय,दिपक राउतराय, पांडुरंग उज्जैनकर,महेश उंबरकर,महेश ठोसर,सुरेश तळेकर,धीरज उंबरकर,रुपेश विंचंनकर,भुषण उज्जैनकर,गुरु उंबरकर,गोपाल पंढरकर,गणेश राऊतराय,प्रसाद राऊरराय, योगेश राऊतराय ईत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.