साखरखेर्डा : पत्नी माहेरी गेलेली असताना शिवाजीनगर येथील एका इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० जुलै रोजी दुपारी पोलिस स्टेशनअंतर्गत घडली. सुनील सिद्धार्थ इंगळे असे मृत इसमाचे नाव आहे.शिवाजीनगर येथील रहिवासी सुनील सिद्धार्थ इंगळे (वय ३५) हा कुटुंबासह वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्याने तो एकटाच घरी राहत होता. त्याने शनिवारी घरातील बल्लीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील यांनी आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे
पत्नी माहेरी गेलेले असताना पतीने घरात गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा! साखरखेर्डा येथील घटना
