Headlines

श्री संत गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्ट मलकापूरच्या वतीने तीन दिवसीय पायदळ वारी संपन्न

मलकापूर :- गुरुपौर्णिमे निमित्ताने श्री संत गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्ट,मलकापूर यांच्या वतीने मलकापूर ते शेगांव तीन दिवसीय पायदळ वारी आयोनज 19,20,21,जुलै रोजी करण्यात आले होते.भुलेश्वर संथान कुलमखेड येथून सकाळी “श्रीं”च्या मुखवटा व पादुकांचे विधिवत पूजन व महाआरती करून सकाळी 8 वाजता पालखी मार्गास्थ झाली.मलकापूर शहरासह पंचक्रोशीतील टाळकरी,वारकरी महिला व पुरुष यांचेसह जवळपास पंधराशे भविकभक्त वारीत सहभागी झाले होते. मलकापूर, नांदुरा,खामगाव,व शेगाव असा तीन दिवसीय वारी करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत पालखी शेगांव येथे पोहचली, मलकापूर सह धानोरा विटाळी, वडणेर,नांदुरा,खामगाव शेगांव येथे ठीक ठिकाणी श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच ठीक ठिकाणी चहा,नाश्ता व जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. या पालखीतून “श्रीं”चा प्रसाद म्हणून आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना प्रसादरूपी वृक्षारोपणा साठी बेलपत्र,अमलतास,पिंपळ,सिसम अशा विविध वृक्षांचे बियाण्यांचे वाटप करण्यात आले व श्री संत गजानन  महाराज यांचा हाच प्रसाद असून या प्रसदाचे वृक्षा रोपण करून श्रीं चरणीं माथा टेकवा व वारी सफल करा अशी विनंती केली.पायदळ वारीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कोरोना काळातही ठराविक भक्तांन सह वारीत खंड न पडू देता गेल्या सतरा वर्षा पासूनची अखंड गुरुपौर्णिमा पायदळ वारीची परंपरा  यशस्वी करण्यासाठी श्री संत गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्ट च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *