Headlines

मलकापूर बस स्थानकात चोरी, आईला उपचाराकरिता घेऊन जात असलेल्या प्रवाशाच्या खिशातील 15000 लांबविलेदिपक

मलकापूर ( उमेश इटणारे ):- आईच्या उपचाराकरिता जळगाव खा. येथे जाण्यासाठी मलकापूर बस स्थानकात आलेल्या प्रवाशाच्या खिशातील बसमध्ये चढताना पंधरा हजार रुपये लांबविण्याची घटना काल दि.19 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मलकापूर बस स्थानकात घडली. याबाबत ( नितीन वाघडे )यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली की त्यांना आईच्या उपचाराकरिता जळगाव खान्देश येथे जायचे होते. त्यासाठी ते आईसोबत मलकापूर बस स्थानकावर आले होते. बस आल्यानंतर बस मध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील पंधरा हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. त्यांनी बसमध्ये बसल्यानंतर खिशाला हात लावून बघितला असता पैसे दिसून आले नाही त्यांनी आजूबाजूला बघितले मात्र कोणीही दिसून न आल्याने पैसे चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. मात्र दाखल तक्रारीची कॉपी फिर्यादी यांना मिळाली नसल्याने पोलिसांनी गुन्हा नोंद केला की नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

चोरांना पकडण्यात पोलिसांना अपयश..

मागील काही महिन्यांपासून मलकापूर शहरात चोरींचे प्रमाण वाढले आहे. घरफोडी, दाग दागिने,मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, गुरांची चोरी, अशा अनेक घटना मलकापूर शहरात मागील काही महिन्यात घडल्या आहेत. पोलीस यांचा तपास सुद्धा करत आहेत. मात्र या घटनांमधील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना अपयशच आले आहे. वाढत्या चोरींच्या घटनांचा पोलीस दप्तरी तक्रारींचा पाऊस पडत आहे. परंतु चोर पकडल्या जात नसल्याने वरिष्ठ अधिकारी कान उघडनी करतील त्यामुळे तर पोलीस तक्रार दाखल करत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस तक्रार दाखल करतात तर मंग फिर्यादी यांना तक्रार कॉपी द्यायला पोलिसांना काय हरकत? यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे.

मलकापूर झाले चोरट्यांचे माहेरघर

गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मलकापूर शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकुळ माजवला आहे. दररोज कोणती ना कोणती चोरीचे घटना घडतच आहे. तनु काही चोरट्यांना पोलिसांचा धाकच उरलेला नाही अशा पद्धतीने रोजच शहरात चोऱ्या सुरू आहे मात्र यामध्ये विशेष असे की यामधील आत्तापर्यंत एकही चोरटा पकडल्या गेल्या नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

मंदिरात चोरी करताना चोरट्याला गावकऱ्यांनी पकडले

दोन दिवसापूर्वी भुरटा चोर अनेक दिवसापासून मलकापूर तालुक्यातील मंदिरामध्ये चोऱ्या करीत होता. मात्र त्याचा पापाचा घडा भरल्याने व लालचे पोटी अगोदरच्या मंदिरामध्ये चोरी केली होती परत त्याच मंदिरात चोरी करायला गेला असता गावकऱ्यांच्या निदर्शनास पडले अन् गावकऱ्यांनी पकडून बेदम धुतले.. त्याही चोरट्याला मात्र गावकऱ्यांनी पकडले ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!