मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथील एनसीसी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बटालियन, खामगाव आयोजित विविध प्रोग्राम मध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव जमदाळे याला महाराष्ट्र बटालियन कडून बेस्ट कॅडेट चा अवार्ड मिळाला, विद्यार्थ्यांनी सायली राजेंद्र वराडे हिला फायरिंग मध्ये पहिले पारितोषिक मिळाले आणि वैष्णवी भोपळे हिला सांस्कृतिक कार्यक्रम लावणी मध्ये पारितोषिक मिळाले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या वेगवेगळ्या पारितोषिक संदर्भात त्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे व महाविद्यालयाचे खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील एनसीसी चे लेफ्टनंट प्राध्यापक मो. जावेद, प्रा. अंकुश नारखेडे, प्रा. अजिंक्य भटकर सह प्राध्यापिका मंजिरी करांडे व माधुरी राजपूत आदी उपस्थित होते. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हे विविध पारितोषिक मिळाल्याबद्दल कमांडिंग ऑफिसर अमित भटनागर, आरएम धर्मेंद्र सिंग सोबतच महाविद्यालयाचे चेअरमन श्री. डी. एन. पाटील उपाख्य नानासाहेब पाटील, महाविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते, श्री. पराग पाटील, श्री. देवेंद्र पाटील, श्री. अनिल इंगळे, डॉ. गौरव कोलते या सर्व व्यवस्थापक मंडळासह महाविद्यालयातील प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
जगातील सर्व संघटनांमध्ये विद्यार्थीप्रिय व लष्करी प्रशिक्षण देणारी भारतातील एन.सी.सी. ही एकमेव संघटना आहे. साहस, जिद्द हे गुण अंगी असणाऱ्या प्रत्येकाला सैन्यदलात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. पण बऱ्याच वेळा शारीरिक क्षमता, गुणवत्ता असूनही केवळ मार्गदर्शनाअभावी सैन्यात भरती होणे सामान्य विद्यार्थ्यांना जमत नाही. म्हणून सक्षम व शक्तीमान सैनिक व अधिकारी घडविणे व त्याचबरोबर आदर्श नागरिक घडवून विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास करणे. गणवेशातील विविध सैनिक भारतीपासून अनेक अधिकारी प्रवेशाची माहिती देणे, मार्गदर्शन करणे या दृष्टीने कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयातील एन.सी.सी. सतत कार्यरत आहे, असे वक्तव्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी यावेळी केले.