खामगाव:- शहरातील एका शाळेत शिक्षीकेसोबत अश्लील कृत्य होत असल्याची घटना 2023 ते 2024 या दरम्यान घडली. वेळोवेळी होत असलेल्या त्रासाला कंटाळून पीडित शिक्षिकेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून शाळेच्या अध्यक्ष गोपाल बाबूलाल अग्रवाल विरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की पीडित महिला आरोपी अध्यक्ष यांच्या शाळेत शिकवणीचे काम करत होती. कोरोना असल्याने शाळा बंद होती. त्यामुळे तेव्हा ऑनलाईन पद्धतीने क्लास घेऊन शिकवण्यात येत होते. 2021 पासून शाळा नियमित सुरू झाल्याने शाळेत नवीन ऍडमिशन करण्याकरता अध्यक्षांनी शिक्षकांना सूचना दिल्या. पीडित शिक्षकेने शाळेत 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ऍडमिशन केल्या त्यामुळे पीडित शिक्षिकेला कॅबिनमध्ये बोलून अभिनंदन केले आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेकडे शिक्षिकेणे मुलाच्या भविष्यासाठी दुर्लक्ष केले परंतु वारंवार अध्यक्षांकडून अश्लील कृत्य व विनयभंग होत असल्याने त्रासाला कंटाळून शिक्षिकेने अध्यक्षांकडे नोकरी सोडण्याचा राजीनामा दिला परंतु अध्यक्षांनी तो स्वीकारला नाही. आरोपी अध्यक्षाचा त्रास वाढतच असल्याने पीडित शिक्षिकेने खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पीडीतेच्या तक्रारीवरून शाळेचा अध्यक्ष गोपाल बाबू अग्रवालवर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास खामगाव शहर पोलीस करत आहे.
शाळेचा अध्यक्ष शिक्षकेसोबत करायचा अश्लील कृत्य, त्रासाला कंटाळून शिक्षिकेची पोलीस ठाण्यात धाव, खामगाव शहर पोस्टेत शाळेच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल!
