मलकापूर: शहराच्या इतिहासात प्रथमच “बेकारी” या सामाजिक प्रश्नावर आधारित मोठ्या पडद्यावरील मराठी चित्रपटाची निर्मिती “गजराम फिल्म प्रोडक्शन” च्या वतीने लवकरच साकारल्या जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ०६ जुलै रोजी सकाळी १२ वाजता,क्रीडा संकुल मलकापूर येथे “बेक्कार” या चित्रपटाचे चित्रीकरण शुभारंभ मुहुर्त मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला.
या चित्रपट मुहूर्त कार्यक्रमाचे उद्घाटक तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार श्री राहुल तायडे, पोलीस निरीक्षक श्री अनिल गोपाळ, समतेचे निळे वादळ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांतजी वानखेडे, श्री रमेशसिंगदादा राजपूत, निर्माते वाजिद कादरी, निर्माते व दिग्दर्शक रामा मेहसरे,श्री भाऊराव उमाळे,श्री सुभाष बावस्कर,यांच्या हस्ते श्री गणेश व नटदेवतेसह स्क्रिप्ट, कॅमेरा चे हार फुले चढवून नारळ फोडून पूजन केले.
पूजन आटोपल्यानंतर मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच कार्यक्रमास साक्ष असणारे पत्रकार बांधवांचे सुद्धा शब्दसुमनाने सन्मान करण्यात आला.दरम्यान या चित्रपटातील कलाकार समुदायाचा परिचय व साकारण्यात येणारी भूमिका कलाकारांकडूनच सांगण्यात आली. तदनंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर कुमार तायडे यांनी केले. गजराम फिल्म प्रोडक्शनच्या सर्व कलाकारांना शुभेच्छा व मार्गदर्शन करताना तहसीलदार राहुल तायडे म्हणाले की, मलकापूर सारख्या तालुक्यात “बिग बजेट” असणाऱ्या चित्रपटाची निर्मिती ही अभिमानाची बाब असून गजराम फिल्म प्रोडक्शन चे अभिनंदन करत आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दीले. ठाणेदार अनिल गोपाळ यांनी मलकापूर शहरवासीयांसाठी ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. रमेशसिंगदादा राजपूत यांनी निर्माते व दिग्दर्शक रामा मेहसरे यांच्यासह कलाकारांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करून म्हटले की ग्रामीण भागातही उत्कृष्ट कलाकार असून त्यांनाही या माध्यमातून संधी आहे.चित्रपटाचे निर्माते वाजीद कादरी यांनी प्रसंगी म्हटले की, हि नवीन कल्पना असून या कल्पनेतून मलकापूर शहरातील काही उभरते कलाकार निर्माण झाल्यास काही फलित होईल या भावनेतून माझी सोबत असण्याची भूमिका राहिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशांतभाई वानखेडे यांनी प्रसंगी म्हटले की, चित्रपट माणसांचे मन बनवते आणी वृत्तपत्र माणसांचे मत बनवते. त्यामुळे चित्रपटातून साकार होणाऱ्या भूमिकेचे समाजमन अनुकरण करते. अशावेळी या चित्रपटातून आदर्शवाद निर्माण होऊन समाजाला दिशा देण्यात यावी अशी आशा बाळगली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कृष्णा मेसरे यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष बावस्कर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजराम प्रोडक्शन च्या सर्व कलाकारांसह सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
चित्रपट निर्मितीत यांचा सहभाग
चित्रपटाचे निर्माते वाजीद कादरी,निर्माता व दिग्दर्शन रामा मेहसरे,सुधीरकुमार तायडे कथालेखन व दिग्दर्शन, निशा ढोले सह दिग्दर्शन तसेच सेलिब्रिटींमध्ये मध्ये सुरेश विश्वकर्मा (सैराट फेम), गजेंद्र जाधव (सिंघम रिटेर्न फ्रेम), रितू राजे (वराडे बाणा फेम) तसेच उत्कृष्ट गायक अजय गोगावले,श्रेया घोषाल कलाकारांमध्ये उमेश पारखेडे, किशोर भारसाकळे, विक्रांत सपकाळ, सौरभ सातव, श्याम निमल, शुभम वावगे, रामा मेहसरे, साक्षी कुटे, वैभव वाडेकर, गजेंद्र यादव, सुरेश विश्वकर्मा, जफर खान, केदार पाटील, नयन सर, जि.ओ जाधव, पवन खांडवैत, जलमकर सर, महबूब शेख, ललिता झनके, मनीषा पाटील, सुभाष बावस्कर, गीता कोठारकर, रितू राजे, शिवाजी सोनवणे, जितेंद्र मेहता, त्रिशा मेहसरे, गणेश तायडे, गणेश सोनवणे, नितीन धाडे, कैलास खडसन, अनिल गोठी आहेत.या चित्रपटासाठी उद्योगपती संतोष बोरगावकर यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभणार आहे.
मी ग्रामीण भागात मोठया पडद्यावरील “बिग बजेट” असलेल्या चित्रपटाची निर्मिती करत आहे.हे धाडस माझ्या सोबत असलेल्या निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, कॅमेरामन, व सहकारी मित्र यांच्या सहकार्यातूनच साकार होणार आहे.यांच्या शिवाय ही कल्पना व धाडस करणे शक्य नाही.
रामा प्रकाश मेहसरे
निर्माते व दिग्दर्शक