मलकापूर: महाराष्ट्र राज्य सीईटी सेल कडून दिनांक 4 जुलै रोजी इंजिनिअरिंग प्रवेशाच्या तात्पुरत्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्व विद्यार्थी व पालक वर्ग सीईटी सेल कधी नवीन अपडेट देणार याबद्दल खूप आतुरतेने वाट होते. सीईटी सेल ने जाहीर केलेल्या पत्रकात येत्या 10 जुलै पासून इंजिनिअरिंग प्रवेशाला सुरु होईल. ही तात्पुरती तारीख जाहीर केली आहे.
अभियांत्रिकी प्रवेश घेण्यासाठी सुरुवात करताना सावधगिरी बाळगणे आणि कागदपत्रे तयार ठेवणे महत्वाचे आहे. अभियांत्रिकी शिक्षण एखाद्याचे करिअर आणि भविष्यातील संभावनांना आकार देण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका घेत असते, त्यामुळे विद्यार्थ्यांला योग्यवेळी माहितीपूर्ण निर्णय घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने योग्य खबरदारी घेतल्याने अभियांत्रिकी चे विद्यार्थी हे सुनीश्चित करू शकतात की त्यांनी योग्य संस्था आणि करिअरचा मार्ग निवडला आहे जो त्याच्या ध्येया पर्यंत सुसंगत आहे. सीईटी सेल ने इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी 10 जुलै ही तात्पुरती तारीख जाहीर केली आहे. यामध्ये बदल होऊ शकतो. इंजिनिअरिंगच्या प्रवेशा करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे अगोदरच तयार ठेवावी जेणेकरून प्रवेशा वेळी विद्यार्थी व पालकांना अडचण येणार नाही. अशी माहिती पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी प्रसिद्धी पत्रकांसोबत बोलताना दिली.
इंजिनिअरिंग प्रवेशा करिता अधिक माहिती साठी विद्यार्थी व पालकांनी कोलते महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे मो. नं. 8989229898 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे सदस्य श्री. अनिल इंगळे व श्री. देवेंद्र पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना केले आहे.