Headlines

नूतन इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा!

 

मलकापूर : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) दिनांक 8 ऑगस्ट रोजी नूतन इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन सोहळा आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील लहान मुलांनी बहिणींच्या हस्ते भावंडांना राखी बांधून स्नेह व आपुलकीचा संदेश दिला. या वेळी शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षिका वृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी राख्या, फुलं व मिठाईच्या माध्यमातून एकमेकांप्रती प्रेम व जिव्हाळा व्यक्त केला. शाळेच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे बंधुत्व, एकोपा व संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर कोरले गेले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!