मलकापूर ( दिपक इटणारे ) –”बातमीचा परिणाम झाला… आणि अखेर प्रशासनही जागं झालं!”मलकापूर तालुक्यातील आळंद शेत शिवारात बिबट्या दिसल्याच्या घटनेची विदर्भ लाईव्हने बातमी प्रकाशित केल्यानंतर वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत बिबट्याच्या हालचालींचा तपास सुरु केला. स्थानिक नागरिकांनी 2 दिवसापूर्वी या परिसरात बिबट्या दिसल्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला होता. त्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर विदर्भ लाईव्हने प्रसारित केलेल्या बातमीनंतर वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी आळंद शिवारात पोहोचले. शेतकऱ्यांशी संवाद साधून अधिकाऱ्यांनी बिबट्याचे अचूक ठसे, हालचाली आणि दिशेचा अंदाज घेतला. उपस्थित नागरिकांना रात्रीच्या वेळी सावध राहण्याचे, शक्यतो एकटे न फिरण्याचे आणि बिबट्याच्या हालचाली दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले. वनविभाग लवकरच परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम सुरू करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
“विदर्भ लाईव्हच्या बातमीची दखल; बिबट्याच्या शोधासाठी आळंद शिवारात अधिकारी दाखल”
