Headlines

पती – पत्नीच्या वादातून चाकूहल्ला; पत्नी गंभीर जखमी; खामगाव येथील घटना

खामगावः लग्न समारंभात पती-पत्नीच्या वादाने गंभीर रूप घेतले आणि पतीने पत्नीला चाकूने भोसकल्याची घटना शेगाव तालुक्यातील वरखेड खुर्द येथे शनिवारी (ता. २४) सकाळी घडली.

शेख हातम शेख अब्दुला यांच्या घरी लग्नसमारंभ सुरू होता. यावेळी शे. मेहबुब शे. अजीज (वय ३५, रा. बर्डे प्लॉट, वरखेड खुर्द) आपल्या पत्नीसमवेत उपस्थित होता. सकाळी ९:३० वाजता पती-पत्नीमध्ये वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर रागाच्या भरात मेहबुबने पत्नीच्या पोटात चाकू मारला. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने अकोला येथे हलवण्यात आले.
या प्रकरणी आबिदाबी शे. इसाक (वय ४५, रा. बर्डे प्लॉट) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पतीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ११८(२) आणि ३५५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन करूटले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!