अज्ञात चोरट्याकडून वेदश्री मोबाईल शॉपी मध्ये चोरी, बॅग सापडली काही पैसे पण सापडले सोनं गेले मात्र चोरटा नाही; पोलिसांच्या कारवाईवर संशय! मलकापूर शहरातील घटना
अज्ञात चोरट्याकडून वेदश्री मोबाईल शॉपी मध्ये चोरी, बॅग सापडली काही पैसे पण सापडले सोनं गेले मात्र चोरटा नाही; पोलिसांच्या कारवाईवर संशय! मलकापूर शहरातील घटना
मलकापूर :- माता महाकाली नगर रोडवर असलेल्या वेदश्री मोबाईल शॉपी मध्ये काल, 24 नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्याने पैसे भरलेली बॅग आणि एक रिकेरिंग मशीन चोरी केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात चोरटा स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या दुकानदाराला पोलिसांनी “गुन्हा उद्या दाखल करू” असे सांगून परत पाठवले.घटना घडली तेव्हा, दुकान सकाळी 10 वाजता उघडले होते. एक अज्ञात व्यक्ती दुकानात आल्यानंतर, दुसऱ्या व्यक्तीने दुकानासमोर ठेवलेली आरो कॅन उचलून साईडला नेली आणि नंतर तो परत दुकानात आला. या संधीचा फायदा घेत चोरट्याने दुकानातील बॅग चोरून नेली. बॅगमध्ये 2 ग्राम सोने, रिकेरिंग मशीन आणि किमतीत 30,000 ते 35,000 रुपये होते. दुकानदाराला ही चोरी समजल्यावर, त्यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तपास सुरू केला आणि काही वेळातच चोरी गेलेली बॅग दुकान मालकाच्या स्वाधीन केली. मात्र, बॅगमधील तीस ते पस्तीस हजार रुपयांपैकी फक्त सात ते साडेसात हजार रुपये बॅग मध्ये मिळून आले बाकी पैसे आणि सोने गायब होते, आणि चोरटा अद्याप पकडला गेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईवर शंका व्यक्त केली जात आहे. दुकानदाराने तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेल्यावर, त्यांना “गुन्हा उद्या दाखल करू” असे सांगून परत पाठवले. या प्रकारावर दुकान मालकाने विदर्भ लाईव्हला सविस्तर माहिती दिली आहे.