Headlines

मलकापूर मतदारसंघात ७०.७५% मतदान, दोन लाख चार हजार 32 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदार संघात अटीतटीची लढत..

मलकापूर: संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांवर मतदान पार पडले. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात होते, आणि महायुती तसेच महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्ये तीव्र अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

मलकापूर-नांदुरा मतदारसंघात एकूण २,८८,३८५ मतदार नोंदणीकृत होते, त्यात १,५०,०५३ पुरुष आणि १,३८,३२६ महिला मतदारांचा समावेश आहे. यामध्ये सहा तृतीयपंथीय मतदार देखील नोंदवले गेले आहेत. मतदानाच्या दिवशी २,०४,०३२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात १,७७,७३३ पुरुष, ९६,२५६ महिलांनी, तसेच तीन तृतीयपंथीयांनी मतदान केले.मलकापूर-नांदुरा मतदारसंघात एकूण ७०.७५% मतदान झाले असून, ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. मतदारसंघातील निवडणुकीला दिलेल्या महत्त्वामुळे, मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदानात सहभाग घेतला, जे सध्याच्या निवडणुकीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!