Headlines

भाजप कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे नागरिकांना झाला त्रास, बुलढाणा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी!

 

( उमेश ईटणारे )
आज, 26 ऑक्टोबर रोजी भाजपाने मलकापूर-नांदुरा मतदारसंघातील माजी आमदार संचेती यांना उमेदवारी देत दुसरी यादी जाहीर केली. या निमित्ताने भाजप कार्यकर्ते माता महाकाली चौकात एकत्र येऊन जल्लोष करत होते. तथापि, त्यांच्या या जल्लोषामुळे बुलढाणा रस्त्यावर वाहतुकीची भीषण कोंडी झाली.

कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत साजरा केलेला उत्सव नागरिकांना नाहक त्रासात ढकलत होता. वाहने एकत्र येऊन रांगा लागल्या, ज्यामुळे वाहनधारकांना पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत थांबावे लागले. रस्त्यावर अचानक झालेल्या गर्दीने अनेकांना आपल्या दैनंदिन कामांसाठी उशीर झाला.

या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चीड आणि असंतोष पसरला आहे. अनेकांनी भाजप कार्यकर्त्यांच्या या अनियोजित जल्लोषामुळे त्यांच्या दिनचर्येत अडथळे येत असल्याचा आरोप केला. या घटनेमुळे भाजपच्या कार्यकऱ्यांविषयी नकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत, ज्यामुळे पक्षाची प्रतिमा मलूल झाली आहे. लोकांना वाटत आहे की, अशी जल्लोष आयोजित करण्याऐवजी कार्यकर्त्यांनी स्थानिक समस्यांकडे लक्ष द्यायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!