मलकापूर शहरात युवकांकडून “जो हिंदुहित की बात करेगा, वही मलकापूर – नांदुरा मतदारसंघ पर राज करेगा” ह्या ओम शिंदेंच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद हजारो युवकांनी ठेवले स्टेटस!

मलकापूर :- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर विभागाचे प्रमुख ओम शिंदे ह्यांच्याकडून केलेल्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे सोशल मीडियावर दिसून आलेले आहे. मलकापूर नांदुरा मतदारसंघात आजवर कुठल्याही लोकप्रतिनिधींनी पाहिजे तसा विकास केलेला नाही. निवडणुका आल्या की पैसे वाटप करणे, दारू पाजणे असे प्रकार मलकापुरात चालतात.असा आरोप शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान मलकापूरचे प्रमुख ओम शिंदे यांनी केला आहे .मलकापूर शहरात वाढती गुन्हेगारी एक समस्या आहे. कारण इथे हिंदू युवकांना रोजगार नाही, सुशिक्षित तरुण बेरोजगार म्हणून हिंडत आहेत. इथे हिंदू समाजाच्या विविध समस्या आहेत. मलकापूर शहराच्या विकासाबाबत बोलायचे झाले तर शहर म्हणून आपण किती मागे आहोत हे सर्वांनी बघितले आहे. खामगाव शहराच्या तुलनेत मलकापूर किती मागासलेले आहे हे स्पष्ट दिसते. इथे विकासाला वाव नाही. इथे हिंदुत्ववादी तरुणांना गळचेपी केली जाते, त्यांच्या पाठीशी इथे कुणीही उभे राहत नाही, सर्व राजकीय नेते हिंदूंच्या मतांवर निवडून येतात मात्र निवडून आल्यावर कुणाच्या तरी भीतीने हिंदूंची बाजू घेत नाहीत. यंदाच्या विधानसभेला जो हींदुहिताला प्राधान्य देईल त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत अश्या प्रकाराचे आवाहन मलकापूर शहर तालुक्यातील हिंदू बांधवांनी केले आहे, त्यासाठीची आवश्यक ती तयारीही त्यांची झालेली आहे असे दिसत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!