मलकापूर:-प्रेम से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी म्हणत, क्वचितच मंडळांनी पारंपरिक वाद्यवर लेझीम खेळत, मिरवणुकीत बहुसंख्य मंडळातील डी.जे. ची लागलेली पैज, आमचाच आवाज मोठा अन् कानात बोटे घालून भक्तांना घेतलेले दर्शन अश्या वातावरणात मलकापूर शहरा सह तालुक्यात 174 ठिकाणी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
3 ऑक्टोबर रोजी शहरासह तालुक्यात घटस्थापना करण्यात आली. मलकापूर शहरात मुख्य मिरवणुकीला सायंकाळी सहा वाजेपासून सुरुवात झाली. शहरातील 60 मंडळापैकी 26 मंडळांना मिरवणुकीची दर वर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा रीतसर परवानगी घेतली होती. या 26 मंडळांची सायंकाळी सहा वाजेपासून मिरवणूकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत बहुसंख्य मंडळांनी आकर्षक म्हणून डी.जे. ला प्राधान्य दिलं. काही मंडळ समोरा समोर येऊन “आमच्याच डी.जे. चा आवाज मोठा असे दाखवत होते मात्र मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या भक्तांना अक्षरशः कानात बोटे घालून दर्शन घ्यावं लागलं हे दुर्दैवच, ” तुमची मजा झाली मात्र दर्शनासाठी आलेल्या भक्तांना सजा झाली”. कदाचित शहरवासीयांना पारंपरिक वाद्यांचा विसर पडला असावा ? मिरवणुकीत शांतता अबाधित राहावी या साठी कर्तव्यदक्ष पो.नी. निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात होता. शहरातील मिरवणूक भक्तिमय वातावरणात आणि शांततेत पार पडली. मात्र डी.जे. चालकांनी मनमानी पध्दतीने डी.जे. वाजवून मलकापूर वासीयांच्या कानठळ्या बसवल्या एवढं मात्र खरं.
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे काही जणांचा मिरवणुकीपासून यु टर्न..
काल दुर्गा देवी मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या अनेक जणांनी मिरवणूक न पाहताच यु टर्न घेतला त्याचे कारणही तसेच आहे काल सहा वाजेपासून मिरवणुकीला सुरुवात झाली त्यात 26 मंडळांनी रीतसर परवानगी घेऊन मंडळ रांगेत लावलेले होते. त्यात काही मंडळांनी मोठमोठे डीजे लावून आपल्याच डीजे चा आवाज मोठा येण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडित नियम ढाब्यावर बसविले. डीजेच्या भल्या मोठ्या आवाजामुळे मिरवणूक पाहण्यासाठी आलेले लहान चिमुकले, वयोवृद्ध, महिला वर्ग, गर्भवती महिला, अश्या अनेक जणांनी मिरवणूक न पाहता यूटर्न घेतला यात विशेष म्हणजे अनेक नागरिकांना व पोलीस कर्मचाऱ्यांना डीजेच्या आवाजामुळे मेडिकल वरून कापूस खरेदी करून कानामध्ये कापसाचा बोळा घालून मिरवणुकीमध्ये राहावं लागल. डीजेच्या अशा स्पर्धेमुळे काहींना कायमस्वरूपी बहिरेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही..?