बुलढाणा :भारताचा शत्रू असलेला पाकिस्तान च्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे ईद-मिलादच्या मिरवणुकीत घडली.दरम्यान, देश विरोधी पाकीस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे
बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सुशिल कोल्हे यांनी नांदुरा पोलिसात फिर्याद दिली की, १६ सप्टेंबर रोजी वडनेर भोलजी येथे ईद- मिलादच्या निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बाजार गल्ली येथे पाकीस्तानच्या समर्थनार्थ हातात हिरवे झेंडे घेवून भारताचा पारंपारिक शत्रु असलेल्या पाकीस्तानच्या समर्थनार्थ हातात झेंडे घेवून पाकीस्तान जिंदाबादचे नारे देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देशविरोधी घोषणा देवून सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्था भंग करुन हिंदु-मुस्लीम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करुन दंगली घडविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. देशविरोधी घोषणा देणाऱ्या व्हिडीओची चौकशी करुन घोषणा देणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा विश्वहिंदू परिषद, बजरंग दलाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाणेदारांना देण्यात आला. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी अज्ञात चौघाविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम ३(५), ३५३(१) (बी), ३५३ (१) सी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (का.प्र.)