Headlines

चोरट्यांची गुरांवर काळी नजर.. गुंगीचे औषध देऊन गुरे चार चाकी वाहनात कोंबली, चिखलात गाडी अडकली अन् चोरट्यांचा प्रयत्न फसला! मलकापूर शहरातील घटना

मलकापूर:- इनोवा कार मधून गुरू ढोरे चोरून नेत असताना पावसाने पडलेल्या चिखलात गाडी फसून चोरट्यांचा कट उधळला ही घटना 14 सप्टेंबर च्या रात्री अडीच वाजेच्या सुमारास शहरातील हनुमान नगर परिसरामध्ये घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या दोन महिना अगोदर शहरातील हनुमान नगर परिसरामध्ये गुरे ढोरे चोरणाऱ्या चोरट्यांचा नागरिकांच्या सतर्कतेमुळे डाव फसला होता. मात्र या घटनेला दोन महिने उलटून जात नाही तर परत एकदा असाच डाव चोरट्यांचा फसला आहे. रात्री अडीच वाजेच्या सुमारास एका घरासमोर बांधलेल्या गुराढोऱ्यांना इनोवा कार मधून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गुंगी चे औषध चाऱ्या मध्ये टाकून खाऊ घातले काही क्षणातच गुरे ढोर सुन्न झाले. या अज्ञात चोरट्यांनी त्यांना चार चाकी इनोवा कार क्रमांक एम एच 15 डी एस 9902 ( गाडी क्रमांक फॅन्सी व पुसट असल्यामुळे बातमी खाली नंबर प्लेट चा फोटो टाकण्यात येत आहे ) या मध्ये टाकून नियोजित दिशेने निघाले होते. मात्र काही अंतरावर आल्यावर पाऊस पडल्याने चिखल झालेल्या गटारीमध्ये चोरट्यांची गाडी फसली त्यांनी जोरात रेस देत गाडी चिखलातून काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येत नसल्याने चार चाकी वाहतूक दोन अज्ञात चोरटे उतरले व गाडी ढकलून काढण्याचा प्रयत्न केले मात्र गाडीचे इंजिनच्या आवाजाने शेजारील नागरीक झोपेतून उठून आले मग चोरट्यांचा प्रयत्न फसला अन् त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. काही क्षणात परिसरातील नागरिक गोळा झाले व त्यांनी इनोवा चार चाकी वाहनात ठेवलेल्या जनावरांना सुखरूप बाहेर काढले व चोरट्यांच्या, गाडीच्या एका-एका भागाची नासधूस केली. या घटनेच माहिती मलकापूर शहर पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास पो.नी. गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!