मलकापूर : एका २२ वर्षीय विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रोजी तालुक्यातील वडोदा येथे घडली. याबाबत रुग्णालयातील कक्ष सेवकांच्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद रविवारी केली. मृत महिलेचे नाव तमन्ना शेख वसीम असे आहे. शनिवारी या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार सासरच्या मंडळींच्या लक्षात आल्यानंतर विवाहितेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र सदर महिलेचा मृत्यू झाला.विवाहितेने एवढा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अस्पष्ट आहे. पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करत आहे.
गळफास घेऊन 22 वर्षीय विवाहित महिलेची आत्महत्या, मलकापूर तालुक्यातील वडोदा येथील घटना!
