मलकापूर:- दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर येथे दि. २२ ऑगस्टला “दैनंदिन संभाषणात महिलाविषयक शिव्यामुक्त भाषेचा वापर” या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह वा दिक्षीत यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणुन मा. उषाताई नारायण बनारे मॅडम, (अध्यक्ष, दुर्गा माता बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ रामवाडी, मलकापूर), प्रा. डॉ अलका जाधव (तायडे) मॅडम के. के. अग्रवाल कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमांचे पुजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. पुढे कार्यकमाचे प्रास्ताविक प्रा. नरेंद्र वा काळबांडे कार्यक्रम समन्वयक यांनी केले, दैनंदिन संभाषणात महिला विषयक शिव्यामुक्त भाषेचा वापर संदर्भात मार्गदर्शन कार्यकमाचा हेतु व कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश सरांनी विषद केले. त्यानंतर उषाताई नारायण वनारे मॅडम, यांनी आपल्या मार्गदर्शनातून व अनुभवातुन अनेक दाखले देत विद्यार्थी व विद्यार्थीनीना जागृती करण्याचा प्रयत्न केला त्याच बरोबर प्रा. डॉ अलका जाधव (तायडे) मॅडम यांनी रामायण, महाभारत पासुन ते आजच्या युगामध्ये आपण भाषेचा वापर कसा करतो त्याच प्रमाणे घरगुती अनेक दाखले देऊन, यामध्ये आपण परिवर्तन करणे गरजेचे आहे असे संबोधित केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्रसिंह दिक्षीत, यांनी अध्यक्षीय मनोगतात दैनदिन जीवन जगत असताना बन्ऱ्यांच बाबी अशा आहे की, त्याच वापर करीत असतो त्यावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. त्याच बरोबर आपल्या रागावर ताबा ठेवला की, या बाबी साध्य होऊ शकतात अशाप्रकारे या विषया संबंधित व कार्यकम घेण्याबाबत माहिती दिली. “दैनंदिन संभाषणात महिला विषयक शिव्यामुक्त भाषेचा वापर” या चर्चासत्राचे समन्वयक प्रा. नरेंद्र वा. काळबांडे हे होते तर सुत्रसंचालन कु. ऋतुजा इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन कु. दिपाली म्हैसागर यांनी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनंदिन संभाषणात महिलाविषयक शिव्यामुक्त भाषेचा वापर कार्यक्रम संपन्न
