शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून 62 वर्षीय महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी, मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी येथील घटना

 

मलकापूर:- शेतात काम करत असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सुमारास मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी शेत शिवारात घडली. जखमी महिलेला खाजगी रुग्णाला दाखल केले असून उपचार सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही दिवसापासून सततधार पाऊस सुरू होता. परंतु दोन ते तीन दिवसापासून पाऊस बंद पडून उन्हाची तीव्रता वाढली होती. मात्र आज 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक वादळीवारा व पाऊस सुरू झाला. अचानक पावसाने रौद्र रूप धारण करून करून विजेचा कडकडाट सुरू झाला. तालुक्यातील म्हैसवाडी शेत शिवारात महिला काम करीत असतांना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली या घटनेत पुष्पा प्रभाकर राणे वय 62 वर्ष यांचा मृत्यू झाला तर योगिता विनोद किनगे वय 45 वर्ष ही महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला शुभम लाहुडकर या तरुणाने त्यांच्या खाजगी वाहनाने मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले तर मृत महिलेला माजी नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी रुग्णवाहिकीचे व्यवस्था करून दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृत महिलेला शवविच्छेदनाला पाठविले.

Leave a Comment

error: Content is protected !!