Headlines

ट्रकाच्या मागच्या चाकाखाली येऊन 60ट्रकाच्या मागच्या चाकाखाली येऊन 60 वर्षीय इसमाचा मृत्यू, मलकापूर शहरातील चार खांबा चौकातील घटना!

मलकापूर :- ट्रकाच्या मागच्या चाकाखाली येऊन साठ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 19 रोजी पाच वाजेच्या सुमारास मलकापूर शहरातील चार खांबा चौक रोड येथे घडली. महादेव चंदू भाऊ मोरे वय 60 वर्ष असे अपघातात मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. सदर इसम हा भिक्षुक असून दृष्टिहीन असल्याची माहिती आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवाजीनगर कडून ट्रक क्रमांक 19 झेड 5532 हा ट्रक मलकापूर शहरात प्रवेश करत होता दरम्यान शहरातील चार खंबा चौकातून ट्रक जात असतांना ट्रकाच्या मागील चाकामध्ये महादेव मोरे आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत इसमाला शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर इसम दृष्टिहीन असून भिक्षुक असल्याची माहिती आहे. घटनास्थळी मोठी गर्दी होऊन वाहणाची रिघ लागली होती. या घटनेचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तडवी व पंकज वराडे यांनी केला तर पुढील तपास पो.नी. गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर पोलीस करीत आहे.

जड वाहतूकीचा मार्ग शहराचे बाहेरून वळवावा -मा. नगरसेवक राजेंद्र वाडेकर यांची मागणी

मलकापूर शहरात मुक्ताईनगर मार्गाने येणारी जड वाहने
इंजिरनिअरिंग कॉलेज, पंतनगर, छत्रपती शिवाजी नगर, चारखंबा चौक, तहसील चौक मार्गे पुढे बुलडाण्याकडे मार्गक्रमण करीत असतात. मुक्ताईनगर रस्त्यावर अनेक शाळा-कॉलेज व सरकरी-निमसरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे वाहनाची व पादचाऱ्याची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वाहतुकीच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी कमी असल्यामुळे लहान मोठ्या वाहनामुळे अनेकवेळा अपघात घडतात. तरी मुक्ताईनगर मार्गे मलकापुर शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या जड वाहनानां कायदेशीर प्रवेश बंदी करण्यात यावी. शहरातून होणारी जड वाहतूक बेलाड-घिर्णी मार्गे वळविण्यात यावे. ज्यामुळे शहरातील रहदारी सुरळीत होईल. अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र वाडेकर यांनी प्रशासना कडे केली आहे मात्र अद्याप पर्यंत प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही मात्र आता तरी प्रशासन धृतराष्ट्राचे सोंग विसरून मागणीची दखल घेणार का ? की आणखी पादचाऱ्यांचा जीव जाण्याची वाट बघणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!