Headlines

उपजिल्हा रुग्णालय मलकापूर आणि खासगी रुग्णालयांची मनमानी कारभार; अपघातग्रस्त रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ; केंद्रीय आयुष मंत्रालय यांनी घेतली थेट विदर्भ लाईव्हच्या बातमीचे दखल; ना. प्रतापराव जाधव यांचे निजी सहाय्यक डॉ. गोपाल डीके आयुष ( स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांचा पाठपुरावा

मलकापूर ( दिपक इटणारे ) :- शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील आरोग्य सेवा अधिकाऱ्यांची बेफिकिरी आणि मनमानी कारभारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. दि. १२ जानेवारी २०२५ रोजी पिंपळगाव देवी रोडवर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, तेथे सर्जन ( हाडाचे )…

Read More

दारू तस्करीप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल ₹99,160 किमतीचा मुद्देमाल जप्त

  मलकापूर:- मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दारू तस्करीवर धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, तब्बल ₹99,160 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाही 14 जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता सुमारास दुधगाव शिवारात केली. या बाबत सविस्तर वृत्त असे की ग्राम दूधलगाव शिवार येथे नाकाबंदी करून पोलिसांनी ही कारवाई केली. ठाणेदार संदीप…

Read More

शासनाकडून लाखोंची मागणी, ॲड. रावळ यांनी साडेतीन हजारांत केली उपजिल्हा रुग्णालयातील फ्रिझरची दुरुस्ती.. उपजिल्हा रुग्णालयाचा गोरखधंदा उघड!

  मलकापुर:- उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहातील (पी.एम हाऊस) मधील फ्रिझर गेल्या महिनाभरापासुन नादुरुस्त असुन ते तात्काळ दुरुस्त करा अन्यथा फ्रीझरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा इशारा शिवसेना (उ.बा.ठा)शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला होता. तर लोकनेते ॲड हरीश रावळ यांनी रुग्णालय अधिक्षक राजेंद्र उंबरकर यांची फ्रिझर दुरुस्तीबाबत कान उघाडणी केली होती मात्र उंबरकर यांनी कागदी घोडे नाचवत वंरीष्ठांशी पत्रव्यवहार…

Read More

अखिल महाराष्ट्र भाट समाज द्वितीय राज्यस्तरीय अधिवेशन संत नगरी शेगाव येथे संपन्न

  शेगांव :- अधिवेशनात उपस्थित प्रमुख पाहुणे अखिल भारतीय सर्व राव भाट संघटन राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामप्रतापजी भाट , मातृशक्ती राष्ट्रीय अध्यक्षा निर्मलाजी राव, राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी श्री नरपत सिहजी भाट, श्री राधेश्यामजी भाट ,श्री कैलास चंद्रजी भाट, राष्ट्रीय सचिव श्री दीपक जी साळवी, राष्ट्रीय सदस्य श्री सुनील जी सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन संपूर्ण…

Read More

अवैध दारू वाहतुक करणाऱ्यावर खामगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई; 54000 रुपयांचा मुद्देमाल जप्त!

खामगाव : देशी आणि विदेशी दारूची अवैध वाहतूक करून विक्री करण्यासाठी जात असलेल्या आरोपीला खामगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी रात्री दहा वाजता पारखेड फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जलंब येथील प्रवीण हरीचंद्र रोठे (वय २२) याच्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी त्याच्याकडे देशी दारूच्या ३०० बाटल्या, विदेशी दारू व बियरच्या…

Read More

शिवसेना नांदुरा शहर व महिला आघाडी यांच्या वतीने तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा..

नांदुरा :- संपूर्ण जगामध्ये ज्या छत्रपती शिवरायांची ख्याती आहे त्या शिवरायांना घडवीणारी माता म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ..! १२ जानेवारी म्हणजेच या राजमातेची जयंती..! राजमाता जन्मोत्सव सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. राजमाता जिजाऊंच्या महान कार्याची व त्यांच्या विचारांची संपूर्ण समाजाला नेहमीच आठवण रहावी म्हणून शिवसेना नांदुरा शहर व महिला आघाडी यांच्या वतीने सलग तीन दिवसीय स्वामी विवेकानंद…

Read More

रविवारी मलकापूरमध्ये आरोग्य सेवा ठप्प; खाजगी डॉक्टरांचा निष्काळजीपणा अपघातग्रस्तासाठी ठरला जीवघेणा

मलकापूर( दिपक इटणारे ): रविवारी खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयांच्या निष्काळजी वर्तणुकीमुळे शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. काल दि. 12 जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका रुग्णाला जीव गमवावा लागला. अपघातग्रस्त रुग्णासाठी तातडीच्या उपचारांची नितांत आवश्यकता असताना, खाजगी डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्णाच्या जीवावर बेतले. शहरातील खाजगी रुग्णालये फक्त व्यवसायिक हितसंबंधांवर लक्ष केंद्रित करीत असल्याचा…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत पती-पत्नी ठार; रणथम फाट्यानजीकची घटना

  मलकापूर: राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर रणथम फाट्यानजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता घडली. या बाबत सविस्तर वृत्त असे की रूईखेड (ता. मुक्ताईनगर) येथील निना ज्ञानदेव नारखेडे (वय ६५) व सुनिता निना नारखेडे (वय ५९) हे पती-पत्नी पुर्णाकाठवरील दुधलगाव येथे नातेवाईकांच्या…

Read More

उद्या वडनेर भोलजीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा.. शिवभक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन!

नांदुरा :- ( उमेश ईटणारे ) राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वडनेर भोलजी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवस्मारक समिती व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उद्या पार पडणार आहे. अनावरण सोहळ्याचे उद्घाटन हुतात्मा संजयसिंह राजपूत यांची वीर पत्नी सौ. सुषमाताई संजयसिंह राजपूत (मलकापूर) यांच्या हस्ते होणार…

Read More

डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; मेहकर तालुक्यातील घटना!

  डोणगाव (ता. मेहकर):- येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या श्रीकृष्ण विजय बनसोड (३५, रा. लोणार) यांनी ९ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. फसवणुकीच्या गुन्ह्यामुळे आलेल्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारींनंतर ३ जानेवारी रोजी त्यांच्या दवाखान्यावर धाड टाकून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली…

Read More
error: Content is protected !!