
तोल गेल्याने विहिरीत पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू, खामगाव तालुक्यातील घटना!
खामगाव, दि. १४ (प्रतिनिधी) – खामगाव तालुक्यातील ढोरगाव येथे १३ जानेवारी रोजी सायंकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत पवन विलास टिकार (वय २५) या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पवन हा सायंकाळी घरासमोरील विहिरीवर गेला होता. दरम्यान, अचानक तोल गेल्याने तो थेट विहिरीत पडला. ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी धाव घेतली आणि तात्काळ मदतकार्य सुरू…