मलकापूर – येथून जवळच असलेल्या विदया विकास माध्यमिक विद्यालय वाकोडी शाळेचा इयत्ता 10 वी चा निकाल 99.21 लागला आहे. यावर्षी विद्यालयातून इयत्ता 10 चे एकूण विद्यार्थी 128 एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 127 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण 99.21% आहे. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांत प्रथम क्रमांक कु. समीक्षा पांडुरंग महासागर हिने 95.80 % गुण मिळवून विद्यालयाचा लौकिक कायम ठेवण्याचे काम केले आहे. द्वितीय क्रमांकाची मानकरी कु. दिव्या रामराव तायडे हिने 94.60 % गुण मिळवीत ठरली आहे. तृतीय क्रमांक अनुक्रमे कु.शिवानी सुनील घोंगटे व कु.समीक्षा गजानन सोनार यांनी 94.20 % गुण मिळवित पटकावीला आहे. तर अनुक्रमे कु. समीक्षा गोपीचंद खोडके, अक्षय ज्ञानेश्वर पाटील व हर्षवर्धन पांडुरंग पाटील ह्या विद्यार्थ्यांनी 93.20 % गुण घेवुन विद्यालयातून चतुर्थ क्रमांक पटकविलेला आहे. विद्यालयातून तब्बल 91 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 33 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. विद्यालयाने याही वर्षी अतिशय उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखलेली आहे. विद्यालय परिसरात यशवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रा. हितेश पाटील, उपाध्यक्ष सौ. मंगलाताई पाटील, संस्था सचिव श्री. एस.डी. पाटील, प्रा. श्री. अमोल पाटील यांचेसह समस्त संस्थापदाधिकारी तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक ल् शुभेच्छा व्यक्त केल्या.