मलकापूर – येथून जवळच असलेल्या विदया विकास जुनियर कॉलेज वाकोडी या कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा 99.18% लागला आहे. तसेच कला शाखेतून 85.45% निकाल लागला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातुन यावर्षी विज्ञान शाखेतून 245 विद्यार्थी तर कला शाखेतुन 55 एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विज्ञान शाखेतून 242 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेतून 47 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची शेकडा प्रमाण विज्ञान शाखा 99.18% आहे, तर कला शाखा 85.45% आहे. विज्ञान शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यात प्रथम क्रमांक वेदांत जितेश टावरी याने 94.50 % गुण मिळवून विद्यालयाचा लौकिक कायम ठेवण्याचे काम केले आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी वेदांत शिवराम कवळे 91.83 % गुण मिळवीत ठरला आहे. तृतीय क्रमांक पराग संतोष बोंबटकर याने 91.50 % गुण मिळवित पटकावीला आहे. कला शाखेतून प्रथम क्रमांक कु. आकांक्षा गोपाळ भिसे हिने 71.33 % गुण प्राप्त करित मिळवीला असून द्वितीय क्रमांक कु. सुप्रिया राजेंद्र मोरे हिने 70.83 % गुण मिळवित पटकावीला. तर तृतीय क्रमांक 69.50 % गुणांसह संकेत धम्मपाल गवई ह्याने पटकवीला. विज्ञान शाखेतून तब्बल 111 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 126 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचा याही वर्षीचा निकाल अतिशय उत्कृष्ट लागलेला आहे. क. महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परांपरा कायम राखली आहे. विद्यालय परिसरात यशवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रा. हितेश पाटील, उपाध्यक्ष सौ. मंगलाताई पाटील, संस्था सचिव श्री. एस.डी पाटील, प्रा. श्री. अमोल पाटील यांचेसह समस्त संस्थापदाधिकारी तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिलीपकुमार अढाव सर व समस्त प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी वृंद यांनीही सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन करीत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.