मलकापूर :- आज दी. 9/7/24रोजी महिला काँग्रेस ची आढावा बैठक व “महिला न्याय दरबाराचे “उद्घाटन. डॉ संजीवनी ताई बीहाडे उपाध्यक्ष महाराष्ट्र महिला काँग्रेस यांच्या वाढदिवसाच्या अवचित्त साधून सौ मीनलताई आंबेकर व संजीवनी ताई यांच्या हस्ते बुलढाणा येथे करण्यात आले.या मध्ये महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तीन महिलांची समिती बनवण्यात आली. यामध्ये निवृत्त अधिकारी म्हणुन प्रा. मीनलताई आंबेकर. वकील म्हणुन प्रिया पाटील व डॉ. नम्रता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. या सभेमध्ये डॉ.संजीवनी ताई यांनी महिला काँग्रेस चा आढावा घेतला बूथ कमिटी, तालुका व शहर कमिट्या व येणाऱ्या विधानसभा याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. मीनल ताई आंबेकर, नंदिनी ताई टारपे यांनी सुद्धा महिलांना बीजेपी च्या फसव्या योजने बाबत माहिती दिली. लाडकी बहीण योजना कशी फासावी आहे यांची माहिती दिली. अध्येक्षीय भाषणात मंगलाताई पाटील जिल्हा अध्यक्ष यांनी महिलांनी स्वतः सक्षम बनावे. आपले अस्थीत्व आपण स्वतः सिध्द करावे असे महिलांना आव्हान केले. सर्व महिलांनी डॉ. संजीवनी बिहाडे यांचा फुलगुछ,साडी -चोळी व दीर्घ आयुष्याच्या वाढदिवसा निम्मित शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमला खालील महिलांची उपस्थिती होती.मंगलाताई पाटील जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस.
डॉ संजीवनी ताई बिहाडे उपाध्यक्ष म. प्र. म मीनलताई आंबेकर, नंदिनी ताई टारपे.प्रमिलाताई गवई,रजिया पटेल, मीराताई माळी,शालिनी वानखेडे,अल्का लंबे,सुनंदा पवार,पंच फुला पाटील,संगीता गाडेकर,विद्या देशमाने, कविता राज्यवैद्य,विमल माने,मनीषा अवचार, कल्पना पाटील,पुष्पा मापारी, सध्या मापारी, सीमा मेहंगे, संजना चव्हाण, लता चव्हाण, सुनिता शेळके,रेणुका पाटील, आम्रपाली अवसरमोल,रंजना घनश्याम चव्हाण, पूजा मिरकुटे,रेखा भंडारे,मनीषा ठाकूर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा पवार व आभार प्रदर्शन सीमा मेहंगी यांनी केली.