मलकापूर ( उमेश इटणारे ):- विदर्भ लाईव्हच्या बातमीनंतर पाणी पुरवठा विभागाला जाग आली आहे.गेल्या महिनाभरापासून फुटलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत होता.मात्र या प्रकाराकडे महिना उलटूनही दुरुस्ती होत नसल्याने पाणीपुरवठा विभाग जाणून दुर्लक्ष करत आहे का अश्या मथळ्याखाली विदर्भ लाईव्हने पाणीपुरवठा विभागाचे लक्ष वेधण्यासाठी बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत पाणीपुरवठा विभागाने फूटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम आज दि 28 जुलै रोजी सुरू केले आहे. माता महाकाली नगर येथील विवेकानंद आश्रम बाजूने गेलेली हि जलवाहिनी महिनाभरापासून फुटलेली होती या जलवाहिनीतून हजारो लिटर फिल्टर केलेल्या पाण्याचा अपव्यय होत होता यामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता.एकीकडे पाण्याचा जपून वापर करा असा संदेश दिला जातो तर दुसरीकडे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष कसे? रोडवर असलेले पाणी,पुरवठा विभागाला दिसत नाही का?असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात होता.या प्रकाराकडे लक्ष देऊन त्वरित जलवाहिनी दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत होते. स्थानिक नागरिकांची समस्या लक्षात घेऊन विदर्भ लाईव्हने पाणीपुरवठा विभागाचे लक्ष वेधण्यासाठी बातमी प्रकाशित केली होती.या बातमीची पाणी पुरवठा विभागाने दखल घेत फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु केल्याने स्थानिक नागरिकांकडून पाणीपुरवठा विभागाचे आभार व्यक्त केले जात आहे.