जलंबः स्थानिक गुन्हे शाखा पथकाने विनापरवाना अवैध रित्या रेतीची वाहतूक करणारे टिप्पर पकडले असल्याची घटना २४ जुलै रोजी ७. ३० वाजता च्या सुमारास जलंब येथील रेल्वे गेट जवळ असलेल्या उड्डाण पुलाजवळ घडली. या बाबत वृत्त असे की बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नाकाबंदी करित असतांना भास्तन येथील पंढरी शिवहरी मिरगे हा टिप्पर क्रमांक एम. एच. २८ बीबी – ३१६२ ने त्याच्या वाहनांमध्ये अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतूक करतांना त्यांच्या वाहनाची स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपासणी केली असता त्याच्या वाहनामध्ये एक ब्रास रेती किंमत १० हजार रुपये व एक लाल रंगाचे टिप्पर किंमत ५५ हजार असा एकूण ५६०००० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद पोहेकाँ राजेंद्र अंभोरे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी जलंब पोस्टेला दिली यावरून पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध अप नं १५८/२०२४ कलम ३०३ (२) BNSS अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोहेकाँ राजेंद्र अंभोरे, पोकाँ अमोल शेजोळ, पोका जयंत बोचे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा आदींनी केली आहे.