Headlines

वृक्षारोपण हि चळवळ होणे गरजेचे आहे : प्रा . सौ . पूनम इंगळे

मलकापूर :- स्थानिक गौरीशंकर सेवा समितीद्वारे संचलित विज्ञान महाविद्यालय , मलकापूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक २८ जुन २०२४ रोजी वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा . सौ . पूनम इंगळे यांनी समुदायासाठी वृक्षारोपण होणे खुप महत्वाचे आहे . वृक्षारोपण हि चळवळ होणे गरजेचे आहे . हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी खुप मदत करेल . झाडे निसर्गाचा अविभाज्य घटक आहे , ती जगली पाहिजेत , वाचली पाहिजेत, नवीन वृक्षारोपण झाले पाहिजे, त्यांचे संवर्धन झाले पाहिजे हे सर्व खरं आहे . याबद्दल प्रयत्न ही होतात . मात्र झालेल्या प्रयत्नांमध्ये आपण कमी पडतो . फक्त प्रसिध्दीसाठी वृक्षारोपण केले जात असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही . जे वृक्षारोपण आपण करणार आहोत त्याबद्दलची प्रथम आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन केले . याप्रसंगी रासेयो स्वयंसेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . योगेश पाटील यांनी स्वयंसेवकांचे कौतुक केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *