मलकापूर: दहावी बारावी नंतर इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टाफ वेलफेअर असोसिएशन मार्फत मोफत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. अभियांत्रिकी, अर्थात इंजिनीअरिंग शिक्षणाविषयी वाटणारं आकर्षण आपल्याकडे आजही कायम आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागादेखील वाढताना दिसतायत. इंजिनीअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये विविध विद्याशाखांबाबत अनभिज्ञता असते. नेमकी कोणती विद्याशाखा निवडायची, त्या शाखेतून पुढे नोकरीच्या नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या विषयातल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार शाखेची निवड करावी. अधिक क्षेत्रात रोजगारांच्या संधी हव्या असल्यास मूळ शाखांची निवड योग्य ठरतं.
सिव्हिल इंजिनीअरिंगचा उपयोग अनेक क्षेत्रांत पाहायला मिळतं. इमारतींचं निर्माण, रस्ते, पूल, कालवे, रेल्वेमार्ग, विमानतळ, पाणीपुरवठा योजना, पाणी वाहून नेण्यासाठी वापरले जाणार बोगदे वा पाइपलाइन्स, धरण, जलसिंचन, बंदरं, बोगदे व अन्य मोठी बांधकामं यांचा समावेश होतो. स्थापत्य अभियंत्याला सर्व प्रकारच्या सर्वेक्षणाचं ज्ञान असणं गरजेचं आहे.
मेकॅनिकल इंजिनीअरिंग यामध्ये यंत्र व यंत्रप्रणाली चालवण्यासाठी औष्णिक व यांत्रिक ऊर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने रचना करणं व त्याचं विश्लेषण करणं या गोष्टींचा समावेश होतो. या क्षेत्रातले अभियंते सर्व प्रकारच्या यंत्राची रचना, चाचणी, निर्मिती व ती कार्यरत करण्याचं काम करतात.
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग यामध्ये इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रोमॅग्नॅटिझमच्या अभ्यासाचा व उपयोगाचा समावेश केला जातो. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग ही सर्वात मोठी व विविध क्षेत्रांत प्रभाव असणारी अभियांत्रिकी शाखा आहे. इलेक्ट्रिकल पॉवर (विद्युत शक्ती) व सिग्नल्स (संदेश)चा वापर केल्या जाणाऱ्या प्रणालींची व उपकरणांची रचना, उत्पादन, उपयोजन व विकास करणारी ही शाखा आहे.
कम्प्युटर इंजिनीअरिंग – या शाखेमध्ये मेमरी सिस्टीम, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट व संगणकाला जोडण्यात येणाऱ्या उपकरणांची रचना व उत्पादन करण्यात येतं. कम्प्युटर सायन्स हे कम्प्युटर इंजिनीअरिंगशी अगदी जवळीक असलेलं क्षेत्र आहे.कम्प्युटर इंजिनीअरिंग – या शाखेमध्ये मेमरी सिस्टीम, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट व संगणकाला जोडण्यात येणाऱ्या उपकरणांची रचना व उत्पादन करण्यात येतं. कम्प्युटर सायन्स हे कम्प्युटर इंजिनीअरिंगशी अगदी जवळीक असलेलं क्षेत्र आहे.
इंजिनिअरिंग च्या प्रवेशा करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे अगोदर च तयार ठेवावी जेणेकरून फॉर्म भरण्याची वेळी विद्यार्थी व पालकांना अडचण येणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी स्टाफ असोसिएशन कमिटी सोबत संपर्क साधावा. यामध्ये संतोष शेकोकार (मो. नं.9011579818), योगेश सुशीर (मो. नं 8007174823), सचिन भोळे (मो. नं), जयप्रकाश सोनोने(मो. नं. 9423722049), महेश शास्त्री(मो. नं. 9637916476), सदाशिव लवंगे (मो. नं. 7020884644), मयुरी पाटील (मो. नं. 9145775466)आदी प्राध्यापक वर्गाचा समावेश आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्टाफ असोसिएशन कमिटी मधील प्राध्यापकांसोबत संपर्क करावा व आपला इंजिनीअरिंग प्रवेशाचा फॉर्म मोफत भरावा असे आवाहन स्टाफ असोसिएशन चे सचिव प्राध्यापक सचिन चौधरी(मो. नं. 9271752220) यांनी प्रसिद्धी पत्रकांसोबत बोलताना दिली.