मलकापूर: शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता अभियांत्रिकी पदविका (पाॅलिटेक्निक) या प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्ज नोंदणीसाठी येत्या ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी देण्यात आलेली मुदत २५ जून रोजी संपुष्टात आल्याने आता ९ जुलै पर्यंत नव्याने मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे.
राज्यात ३९० संस्थांत सुमारे 1 लाख ५ हजार प्रवेश क्षमता आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. खुल्या गटासाठी प्रवेश अर्जाची रक्कम चारशे रुपये तर राखीव प्रवर्गाला तीनशे रुपये आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी एकूण ३१६ अर्ज सुविधा केंद्र आहेत. पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी व पोलिटेक्निक महाविद्यालय, मलकापूर येथे पॉलीटेक्निक च्या प्रवेशासाठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू आहे. अभियांत्रिकच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुविधा केंद्राचे कार्य अविरत सुरू आहे. या सुविधा केंद्राचा लाभ जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल खर्चे यांनी केले आहे. तसेच पॉलीटेक्निक प्रवेशासंबधित अडचणी दूर करण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे मो. नं. ८९८९२२९८९८ यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती महाविद्यालयाचे सदस्य डॉ. गौरव कोलते व पराग पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकांना दिली आहे.