नांदुरा (प्रतिनिधी) – अभ्यासात सातत्य, जिद्द व मेहनत कायम ठेवल्यास यश निश्चित मिळते. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जिवनामध्ये आपले ध्येय निश्चित करून अभ्यास केल्यास ते अयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतील, असे प्रतिपादन शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिका संघटना महिला जिल्हाध्यक्षा सौ. कोमलताई सचिनराव तायडे यांनी केले. आज १० जून रोजी मामुलवाडी येथे शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी, युपीएससी अभ्यासिका व शाळा व्यवस्थापन समितिद्वारा आयोजित उन्हाळी वर्गाचा समारोप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्ती गावंडे गुरुजी हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये सौ. कोमलताई सचिनराव तायडे महिला जिल्हा के अध्यक्ष शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका र संघटना, कार्यकारी अभियंता हजारे, अॅड. दळवी, तहसीलदार राहुल तायडे, राजूभाऊ गावंडे, एकनाथ पाटील, प्रशांत पाटील, किशोर गावंडे, सारंगधर मोरे, संदीप गावंडे, संदीप मुडेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ हजर होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा वि संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राजेश गावंडे हे शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिकेच्या माध्यमातून ही धुरा आपल्या खांदयावर घेऊन यशस्वीपणे ते कार्य करीत असल्याने त्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन उध्दवर सर गावंडे यांनी तर प्रास्ताविक संजय गावंडे सर यांनी केले. आभार प्रदर्शन भगत सर यांनी केले.