मलकापूर( दिपक इटणारे ):- महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना या योजने अंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये अनुदान देण्याचे जाहीर केलं आहे परंतु या योजनेचे कागदपत्रे अपलोड करण्याचे महिला शक्ती संकेतस्थळ अॅप अतिशय कासव गतीने चालत असल्याने महिला वर्गाकडून सेतू केंद्रावर येरझार होत असल्याचे चित्र दिसत आहे.
नुकतेच दर महिन्याला पंधराशे रुपये अनुदान प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाने जाहीर केल्याने महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु संत गतीने चालणाऱ्या अॅप अभावी ओटीपीच्या अडथळ्याने महिला वर्गामध्ये मध्ये डोकेदुखी झाल्याने सर्वत्र महिलांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे या योजनेतून पात्र महिला वंचित राहू नये याबाबत राज्य शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे परंतु महिला वर्ग अशिक्षीत असल्याने या योजनेबाबत कागदपत्रे कोणाकडे व कधी द्यायचे असा संभ्रम निर्माण होत आहे. संबंधितांनी शहरी व ग्रामीण भागात या योजनेबाबत जनजागृती करून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे..