Headlines

म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता कार्यालयाची लाईट कट करण्याचा शिवसेना (उ.बा.ठा) ने ईशारा देताच वाकोडी ग्रा.प.हद्दितील आदर्श नगर,साई नगर भाग 1,2 साठी नविन ट्रान्सफॉर्मर मंजुर

मलकापुर:- वाकोडी ग्रा.प.हद्तील आदर्श नगर,साई नगर,भाग 1,2, पवनसुत नगर,सरस्वती नगर, नालंदा नगर, आदि नगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पावसाळ्यात वेळोवेळी जाणाऱ्या लाईट मुळे 100 के.व्हि च्या ट्रान्स्फर ऐवजी 200 के.व्हि चा ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या मागणीसाठी दि.18 मंगळवार रोजी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत, शिवसेना उपशहरप्रमुख शे.समद कुरेशी,कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास,मोहन सोनोने,मो.ईसाक तेली,सत्तार शाह,सह स्थानिक रहिवाशांनी म.रा.वि.वि कंपनी अधिकाऱ्यांना निवेदन देत 200 के.व्हि.चा ट्रान्सफॉर्मर बसवा व डि.पी बाॅक्स मध्ये नविन फ्युज बाॅक्स बसवा अन्यथा शिवसेना (उ.बा.ठा) च्या वतीने आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता निवेदन देवून दहा दिवस उलटून सुद्धा निगरगट्ट म.रा.वि.वि कंपनीने दखल घेतली नाही, त्यातच काल गुरुवारला उपरोक्त नगरातील लाईट गेल्याने संतप्त नागरीकांनी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांना हि बाब सांगितल्याने आज दि.28 जुन शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता नविन ट्रान्सफॉर्मर न बसविल्यास म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता कार्यालयाची लाईट कट करण्याचा इशारा दिल्यामुळे म.रा.वि.वि कंपनी प्रशासनाची एकच धांदल उडाली याबाबतची माहिती शहर पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांना मिळाल्याने त्यांनी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला दुपारी बारा वाजता शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर किसान सेना शहरप्रमुख सै.वसीम सै.रहीम,कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास,वाहतुक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, विभाग प्रमुख सत्तार शाह सह शिवसेना पदाधिकारी व स्थानिक रहिवाशांनी कार्यकारी अभियंता मिश्रा यांची भेट घेऊन चर्चा केली असता त्यांनी तात्काळ नविन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे अभियंता गायकवाड यांना आदेशित केले दोन -दिवसांत नविन ट्रान्सफॉर्मर बसवून त्यावरील उपरोक्त नगरातील लोड वेगवेगळा केल्या जाईल असे लेखी आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले!

कार्यकारी अभियंता मिश्रा यांनी लेखी आश्वासन देत तिन दिवसांत नविन ट्रान्सफॉर्मर बसवून आदर्श नगर, साई नगर भाग 1, 2, पवनसुत नगर सह आदि नगरातील लोड (डिव्हाईड)वेगवेगळा करुन वेळोवेळी या परिसरातील लाईट जाणार नसल्याचे सांगितल्याने तुर्त कार्यकारी अभियंता कार्यालयाची लाईट करण्याचा आजचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असुन तिन दिवसांत नविन ट्रान्सफॉर्मर न बसविल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन शिवसेना (उ.बा.ठा) करणार!
गजानन ठोसर
शिवसेना शहरप्रमुख (उ.बा.ठा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *