मलकापूर :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मलकापूर तालुका व शहरातील शेतकऱ्यांचे गेल्या वर्षभरापासून अनुदान रखडले असून ते अनुदान पाच दिवसात न दिल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला ठोकोचा इशारा मलकापुर शहर व तालुका (उ.बा.ठा)शिवसेनेच्या वतीने दि.20 जुन रोजी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला होता,पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला त्यावर निगरगट्ट कृषी अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई न केल्याने आज संतप्त शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकारी व शेतकऱ्यांनी कार्यालयातुन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला आज दि.25 जुन रोजी ताला ठोकला यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जय भवानी जय शिवाजी,हा आवाज कुणाचा…शिवसेनेचा” ” शेतकऱ्यांना सन्मान निधी चे पैसे मिळालेच पाहिजे” अश्या गगनभेदी घोषणा देत परीसर दणाणून सोडला.
शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेअंतर्गत मोठा गाजावाजा करून सन्मान निधी देण्याचे शासनाने जाहीर केले मात्र गेल्या वर्षभरापासून हे अनुदान रखडल्याने शेतकऱ्यावर आता उपासमारीचे पाळी आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेसाठी लागणारी के.वाय.सी, कागदपत्रे संबंधित कृषी अधिकाऱ्याला वेळोवेळी सादर केली असून अद्यापही कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधीचे पैसे जमा केले नाही,पाच दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला”ताला ठोको “इशारा देण्यात होता आज दि.25 रोजी शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शिवसैनिकांनी व शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयाला ताला ठोकला.