Headlines

उज्वल भविष्य घडवायचे असेल तर स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडावा लागेल- अनिल अकाळ

मलकापूर : तुम्हाला उज्वल भविष्य घडवायचे असेल तर स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडावा लागेल. यासाठी तुम्ही आर्टस्, कॉमर्स, सायन्स कुठल्या क्षेत्रातून आला आहेत याला महत्व राहत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना ज्यामध्ये आवड असेल ते क्षेत्र निवडायची पालकांनी मोकळीक द्या. एक विद्यार्थी घडला तर तो त्याच्या तीन पिढ्या घडवू शकतो, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.बुलढाणा अनिल आकाळ यांनी केले.

आज २८ जून रोजी मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा सचिव इंजि.सचिन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वधर्मिय गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन छत्रपती शिवराय मराठा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनिल आकाळ हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राज्य सचिव डॉ.मनोहर तुपकर तर प्रमुख उपस्थितीत कृउबासचे सभापती शिवचंद्र तायडे, भाराकाँ नेते अ‍ॅड.साहेबराव मोरे, राकाँ नेते संतोषराव रायपुरे, शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले, खविस अध्यक्ष श्रीकृष्ण खापोटे, सुभाष पाटील, प्रविण क्षिरसागर, युवानेते कपिल राठी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, राकाँ जिल्हा उपाध्यक्ष एस.पी.संबारे सर, राकाँ जिल्हा सचिव प्रसादराव जाधव, राकाँ जिल्हा उपाध्यक्ष बाळू पाटील, राकाँ तालुकाध्यक्ष राजू साठे, भाराकाँ शहराध्यक्ष राजू पाटील, भाराकाँ तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष इंजि.सौ.कोमलताई सचिन तायडे, सौ.अश्विनीताई देशमुख, ह.भ.प.नितीन महाराज, प्रा.अमोल पाटील, प्रा.मोरे सर, युसुफ खान सर, वरखेडचे माजी सरपंच निळकंठराव तायडे, मनसेचे पंकज पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा सचिव इंजि. सचिन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली १० वी ९० टक्केचे वर व १२ वी मध्ये ८५ टक्केच्या वर गुण प्राप्त करणार्‍या, स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्वधर्मिय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याअंतर्गत दहावीच्या २७२ विद्यार्थ्यांचा, बारावीच्या ६३ विद्यार्थ्यांचा तर एनएमएमएसच्या ६८ विद्यार्थ्यांचा, नीट परीक्षतील ९, क्रीडा क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त १२, अधिकारी नियुक्त ६, पीएचडी पदवीप्राप्त २, वैद्यकीय क्षेत्रातील २ जणांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुढे बोलतांना अकाळ सर यांनी सांगितले की, पालकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरीत करावे. परंतु असे करत असतांना लहानपणापासून त्यांची नैसर्गिक कोणत्या क्षेत्रात आहे याचा शोध घेत त्या क्षेत्राकडे त्यांना वळविल्यास ते नक्कीच यशस्वी होतील, असा सल्ला दिला.
तर अ‍ॅड.साहेबराव मोरे यांनी शिक्षण घेतले तरच भविष्यात आपण कुठल्याही क्षेत्रात वावरू शकतो. याकरीता विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकरीता परिश्रम घ्यावे, असे आवाहन केले. तर युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण संकेत अढाव याने आपण ध्येय ठेवून वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते. नियोजनबध्द अभ्यास करा असे आवाहन केले. संजय रहाटे सर यांनी मराठा सेवा संघाच्या वतीने सदैव विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले जाते. आत्मनिर्भर बनविण्यासाठी मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगितले.
तर प्रास्ताविकात मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव इंजि.सचिन तायडे यांनी विद्यार्थी १० वी व १२ वी मध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होतात. त्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कोठेतरी सन्मान व्हावा व या होत असलेल्या सन्मानामुळे व याठिकाणी मिळत असलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी प्रेरीत होत जिद्दीने उच्च शिक्षणात यश संपादन करावे या हेतूने आम्ही सदर कार्यक्रम आयोजित करीत असल्याचे त्यांनी सांगून कुठल्याही विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी अडीअडचण आल्यास मराठा सेवा संघ सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील अशी ग्वाही दिली.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मनोहर तुपकर सर यांनी आपण आज जे उभे आहात केवळ आई-वडीलांमुळे आहोत हे विद्यार्थ्यांनी विसरू नये. तसेच आज ज्या १० वी व १२ वी वी च्या विद्यार्थ्यांचा गुणवंत म्हणून सत्कार झाला त्या सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात याच मंचकावर उच्च शिक्षीत अधिकारी, यशस्वी उद्योजक म्हणून पुन्हा एकदा सत्कारासाठी पात्र व्हावे, असे आवाहन तुपकर सर यांनी करीत इंजि.सचिन तायडे यांच्या माध्यमातून मलकापुरात मराठा सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी चालू असलेली तळमळ खरोखर प्रेरणादायी असल्याचे सांगत यापासून प्रेरणा राज्यात ठिकठिकाणी असे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित व्हावे, असे आवाहन गुणवंतांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे संचालन मराठा सेवा संघाचे मलकापूर तालुकाध्यक्ष रविभाऊ खराटे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव विष्णू म्हसागर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप अढाव सर, उल्हासराव संबारे, पुरूषोत्तम वनारे, नवल तायडे, संभाजीराव गायकवाड, मंगेश धोरण, विजय गायकवाड, ज्ञानदेव ढगे, निलेश आसटकर, अमोल देशमुख सर, शिवाजी देशमुख, मंगेश घोंगटे, चंद्रशेखर तायडे, विवेक तायडे, रविंद्र भोलणकर, अण्णा गायकवाड, प्रमोद क्षिरसागर, रवि लांडे, विवेक तायडे, गजानन काकर, गजानन संबारे, संदीप सारोकार, राहुल वनारे, शुभम काजळे, शुभम लाहुडकर, श्रीकृष्ण क्षिरसागर, इच्छाराम संबारे, विष्णू संबारे यांचेसह बुलढाणा जिल्हा मराठा सेवासंघ मलकापूर तालुवâा, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आदींचे पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सुरूवात वेदांगी पाटील, जिजाऊ ढगे, शर्वरी आसटकर यांनी जिजाऊ वंदनेने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *