मलकापूर :- 2024 चा वार्षिक अर्थ संकल्प हा महिला सक्षमीकरणावर भर देणारा आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका बद्दल बोलायचे तर ग्रामीण महिलांना ८१ लाख बचत गटांमध्ये एकत्रित केले आणि या गटांना सक्षमीकरणाच्या पुढील टप्प्यावर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या उत्पादक उपक्रम किंवा समूहाची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले आहे. तरी गटांमार्फत एकत्रित केलेल्या महिलांना त्यांनी बनवलेले उत्पादने विकण्यासाठी बाजारपेठ सुद्धा अत्यंत गरजेची आहे यावर सुद्धा सरकारने विचार करावा एकंदर या अर्थसंकल्पात महिलांची आर्थिक प्रगती कशी होईल या दृष्टीने व्यापक दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे परंतु हाच दृष्टिकोन प्रशासनाने प्रत्यक्षात उतरवावा हीच इच्छा.
-इंजि कोमलताई सचिन तायडे
सामाजिक कार्यकर्त्या मलकापूर